www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या २०१६ मध्ये ७० वर्षांच्या झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त होणार असल्याचा, दावा पत्रकार-लेखक रशीद किडवई यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. `२४ अकबर रोड` या पुस्तकात किडवई यांनी हा दावा केला आहे.
सध्या काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या राहुल गांधी यांना मोठी भूमिका देण्यासाठी सोनिया गांधी हे मोठे पाऊल उचलणार असल्याचे किडवई यांचे म्हणणे आहे. किडवई यांनी पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार, सोनिया गांधी यांनी 9 डिसेंबर 2012 ला आपला वाढदिवस साजरा करताना मोजक्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसमोर ही इच्छा व्यक्त केली होती. सोनियांच्या या घोषणेमुळे अनेक नेते सुन्न झाले होते. कारण, आतापर्यंत कोणत्याही काँग्रेस प्रमुखाने राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही.
सोनियांच्या घोषणेनंतर नेत्यांना त्यांना राहुल यांना जबाबदारी देण्याचे सुचविले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्षपद देण्यात आले. तोपर्यंत राहुल गांधी हे फक्त पक्षाचे महासचिव होते. तसेच त्यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही राहुलला मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.