24taas

फर्लो सुट्टीतत वाढ करण्यासाठी संजय दत्तचा अर्ज

बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त नुकताच चौदा दिवसांच्या संचित रजेवर (फर्लो) बाहेर आलेला असताना रजेत पुन्हा काही दिवसांची वाढ करावी यासाठी त्यानं अर्ज केला आहे. येरवडा कारगृह प्रशासनानं या वृत्तास दुजोरा दिला आहे.

Jan 7, 2015, 10:42 AM IST

सायन-कुर्ला दरम्यान रुळाला तडे गेल्यानं म.रे पुन्हा विस्कळीत

रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं गेल्या आठवड्यात दिव्याजवळ झालेल्या आंदोलनाची घटना ताजी असतानाही मध्य रेल्वेचं रडगाणं अद्याप कायम आहेच. सायन-कुर्ला स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. 

Jan 7, 2015, 09:03 AM IST

सॅमसंगचे नवे ४ स्मार्टफोन, गॅलेक्सी ए३, ए५,ई५ आणि ई७

सॅमसंग इंडियानं मंगळवाली चार नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी ए३, गॅलेक्सी ए५, गॅलेक्सी ई५ आणि गॅलेक्सी ई७ सॅमसंगने बाजारात आणले. 

Jan 7, 2015, 08:55 AM IST

मासिक पाळी दरम्यान वाढते धुम्रपानाची इच्छा

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार मासिक पाळीदरम्यान महिलांमध्ये धुम्रपान करण्याची इच्छा खूप वाढते, असं सांगण्यात आलंय. इतर दिवशी धुम्रपान सोडणं सोपं असतं. कारण मासिक पाळीदरम्यान शरीरात निकोटीनची गरज वाढते. 

Jan 6, 2015, 04:38 PM IST

सुनंदा पुष्कर यांची हत्याच, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

 माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाली होती, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिल्ली पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी दिली आहे.   

Jan 6, 2015, 03:24 PM IST

वीजेवर संक्रात येणार? कोळसा कामगारांचा संप

कोळसा खाणींच्या खाजगीकरणाविरोधात देशातल्या ५ मुख्य कामगार संघटनांनी एकत्र येत पुकारलेल्या देशव्यापी संपाला आजपासून सुरूवात झाली आहे. कोळसा कामगारांचं नेतृत्व करणाऱ्या कोल इंडियाच्या अंतर्गत येणाऱ्या पाचही कामगार संघटनांनी एकत्र येत संप पुकारला आहे. हे  काम बंद आंदोलन ५ दिवस चालणार आहे. 

Jan 6, 2015, 02:59 PM IST

अडवाणी आणि बाबा रामदेव यांना मिळणार पद्म पुरस्कार?

 केंद्र सरकारनं भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना 'भारतरत्न' सन्मान जाहीर केल्यानंतर आता मोदी सरकार भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा 'पद्म' पुरस्कारानं गौरव करणार असल्याचं समजतंय. 

Jan 6, 2015, 02:28 PM IST

सरकारमध्ये 'गृह'कलह, खडसेंनी लिहिलं पत्र!

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन मंत्र्यांमध्ये नाराजी उमटलीय. नुकत्याच ४२ IAS अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बदल्या केल्या. मात्र बदल्या करताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नाही म्हणून, मंत्र्यांमध्ये नाराजी पसरलीय. 

Jan 6, 2015, 12:16 PM IST

निर्मात्यानं ३ महिने डांबलं, शिवसेनाप्रमुखांनी सोडवलं – सुप्रिया पाठारे

अभिनेत्री सुप्रिया पाठारेनं राजस्थानच्या एका निर्मात्यावर आरोप केलाय. राजस्थानमध्ये एका फिल्मच्या शूटिंग दरम्यान एका निर्मात्यानं तिला तब्बल तीन महिने डांबून ठेवलं होतं. मात्र दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोडवलं, असं सुप्रियानं सांगितलं. 

Jan 6, 2015, 11:43 AM IST