पाकच्या माजी मंत्र्यांची अमेरिकेत चौकशी
पाकिस्तानचे माजी मंत्री शेख रशीद यांची चक्क अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची चौकशी करण्यात आली. रशीद यांचे लष्कर ए तैय्यबा आणि मुंबई हल्ल्यातील मुख्य सुत्रधार हाफिज सईद याच्याशी संबंध असल्याच्यी पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आली. रशीद यांना ह्युस्टन विमानतळावर ताब्यात घेण्यात आले.
Jun 28, 2012, 03:29 PM IST'पाकिस्तान आंतरराष्ट्रीय डोकेदुखी'
उग्रवादी, गरिबी आणि ढेपाळलेलं सरकार अशी अवस्था असलेलं पाकिस्तान साऱ्या जगाचंच डोकेदुखी ठरतंय, आणि अमेरिकाही इथले प्रश्न सोडवण्यासाठी कमी पडतंय, असं म्हटलंय अमेरिकेच्या माजी विदेशमंत्री मेडली अलब्राईट यांनी. अलब्राईट या सध्या भारत दौऱ्यावर आहेत.
Jun 26, 2012, 10:48 AM ISTतालिबानने केलं भारताचं कौतुक
आज अत्यंत आश्चर्यकारक घटना घडली आहे. आज अफगाणी तालिबानने भारताचं चक्क कौतुक केलं आहे. अमेरिकेने केलेल्या अवाहनाला आणि दबावाला भारत बळी न पडल्याबद्दल तालिबानने भारताचे कौतुक केलं आहे. तालिबानचं म्हणणं आहे की भारत हा या प्रांतातील अत्यंत महत्वाचा देश आहे, यात काहीच शंका नाही.
Jun 17, 2012, 08:12 PM ISTचीन-अमेरिका दोस्ती, इराणची उतरवणार मस्ती
इराणकडून तेल आयात करताना काही अडचण येऊ नये यासाठी अमेरिकेने काही गोष्टींचा विचार करता चीनशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. इराणवर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिका आता चीनची मदत घेतली आहे.
Jun 13, 2012, 02:15 PM ISTअमेरिकेकडून भारताला तेल आयातीत सूट
ईरानकडून भारत तेल आयात करताना काय काय उणीवा भासतात, याचा अभ्यास केलाय अमेरिकेनं... वेगवेगळ्या सुत्रांकडून त्यांनी यासंबंधीचे आकडे मिळवलेत. यामध्ये भारत सरकार तसंच सार्वजनिक क्षेत्राकडून उपलब्ध झालेले आकड्यांचाही समावेश आहे. आणि याच आकड्यांचा अभ्यास करून अमेरिकेनं भारताला वेगवेगळ्या सूट दिल्या आहेत.
Jun 12, 2012, 01:58 PM ISTबीएमएमचे १६वे अधिवेशन जाहीर
अमेरिकेतल्या बृहन महाराष्ट्र मंडळाचे (बी.एम.एम.) १६वे अधिवेशन ५ ते ७ जुलै २०१३ दरम्यान होणार आहे. हे अधिवेशन बॉस्टनलगतच्या र्होड आयलंड राज्यातील प्रॉव्हिडन्स शहरात होणार आहे. या अधिवेशनाचे आयोजन बॉस्टन येथील न्यू इंग्लंड मराठी मंडळ करत आहे.
Jun 11, 2012, 08:23 PM ISTभारत ही जागतिक शक्ती - अमेरिका
भारत जगातील मोठी शक्ती असून हा देश आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावत आहे, असे मत अमेरिकी संरक्षण मंत्रालय असलेल्या पेंटागॉनने नोंदविले आहे
Jun 7, 2012, 07:48 PM ISTअमेरिकेत काली मातेच्या नावाची बिअर!
अमेरिकेसह पाश्चात्य देशात हिंदू देवी-देवतांच्या चित्रांचा दुरपयोग तसेच त्यांचा विचित्र पद्धतीने केलेल्या वापरामुळे भाजपने आज राज्यसभेत आवाज उठवला आहे. अमेरिकेत एका बिअर कंपनीने आपल्या उत्पादनाचे नाव काली मातेवर ठेवले असल्याची धक्कादायक माहिती आज भाजपतर्फे राज्यसभेत देण्यात आली.
May 15, 2012, 08:18 PM ISTसमलिंगी विवाह: काही गैर नाही - ओबामा
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी एक आश्चर्यकारक विधान केले आहे. आपला समलिंगी विवाहाला पाठिंबा आहे. यात काही गैर नाही. मात्र, हे माझे वैयक्तिक मत आहे, असा खुलासाही आोबामा यांनी केला आहे.
May 10, 2012, 01:43 PM ISTअमेरिकेचा पाकिस्तानात हल्ला
दहशतवादी कारवायांत वाढ होत असल्याने अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांना अद्दल घडविण्यासाठी पाकिस्तानमधील उत्तर वझिरीस्तानमध्ये अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. अमेरिकन हल्ल्यात नऊ दहशतवादी ठार सांगण्यात येत आहे.
May 5, 2012, 03:54 PM ISTपाकचे पंतप्रधान गिलानीच - अमेरिका
पाकिस्तानेच पंतप्रधान युसुफ रजा गिलानीच आहेत. त्यांच्याबरोबर आमचे काम सुरू आहे. कारण ते लोकशाहीप्रणीत सरकारचे ते प्रमुख आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे.
Apr 28, 2012, 04:20 PM ISTनरेंद्र मोदींना व्हीसा नाही - अमेरिका
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिसा देण्याच्या धोरणात कोणताही बदल करण्यास, अमेरिकेच्या प्रशासनानं नकार दिला आहे. अमेरिकी संसद सदस्य जो वाल्श यांच्या विनंतीपत्रावर स्पष्टीकरण देताना, मोदींना व्हीसा देण्यात येणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केले आहे.
Apr 26, 2012, 02:06 PM ISTभारतीय विद्य़ार्थ्याची अमेरिकेत हत्या
अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठात एमबीए करणा-या एका २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हा विद्यार्थी भुवनेश्वर येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Apr 21, 2012, 04:05 PM ISTकाबूल हल्ला : पाक-अमेरिकेत चर्चा
दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हल्ला केल्याने याची दखल अमेरिकेने घेतली आहे. याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानशी द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. त्यावेळी काबूल हल्लाबाबत बोलणी केलीत.
Apr 17, 2012, 05:22 PM ISTशाहरुख खानची अमेरिकेत चौकशी
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला न्यूयॉर्क इमिग्रेशननं चौकशीसाठी दोन तास ताब्यात घेतल्याची घटना समोर आलीय. शाहरूख अमेरिकेतल्या येल युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेलाय. मात्र येलला जाण्यापूर्वीच त्याला न्यूयॉर्क विमानतळावर रोखण्यात आलं आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली.
Apr 13, 2012, 10:11 AM IST