balasaheb thackeray

राज-उद्धव यांची शेवटची भेट २००८ साली

आज राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंची भेट तब्बल साडेतीन वर्षांनी झाली. यापूर्वी २००८ साली राज यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.

Jul 16, 2012, 06:42 PM IST

राज बनले 'सारथी' उद्धवांना सोडले 'मातोश्री'वरती

गेल्या काही वर्षांपासून राजकीय बंधनांमध्ये अडकलेल्या ठाकरे बंधूंनी सर्व बंधने झुगारून रक्ताच्या नात्यांना जवळ करत एकाच दिवशी एक नाही दोन वेळा भेट घेतली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या गाडीतून मातोश्रीवर सोडले.

Jul 16, 2012, 06:27 PM IST

राज ठाकरे बाळासाहेबांना भेटायला 'मातोश्री'वर

आजाराच्या निमित्ताने का होईना, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले. तब्बल साडेतीन वर्षानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता राज ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे.

Jul 16, 2012, 06:13 PM IST

मुखर्जी-पवार घेणार शिवसेनाप्रमुखांची भेट

राष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत. रात्री आठ वाजता मातोश्रीवर ही भेट होणार आहे.

Jul 13, 2012, 08:52 AM IST

सीमावासियांच्या पाठिशी शिवसेना - ठाकरे

आज बेळगावच्या महापौर आणि नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली. सुमारे तासभर त्यांनी बाळासाहेबांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना शेवटपर्यंत सीमावासियांच्या पाठिशी राहिली असं आश्वासन बाळासाहेबांनी सामीवासियांना दिलं.

Jul 8, 2012, 06:05 PM IST

'मिसाइल मॅन'वर शिवसेनाप्रमुखांचं मिसाइल

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ‘टर्निंग पॉइंट’ या आत्मचरित्रात सोनिया गांधींबाबत केलेल्या खुलाशावरून वाद वाढतोच आहे. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही कलमांवर त्यांच्या खुलावावरून टीकास्त्र सोडलंय.

Jul 2, 2012, 02:48 PM IST

प्रणव मुखर्जींमध्येच क्षमता आहे- बाळासाहेब

प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्तीप्रदर्शनावर शिवसेनाप्रमुखांनी टीका केली आहे. याचबरोबर प्रणव मुखर्जींना दिलेला पाठिंबा म्हणजे यूपीएला दिलेला पाठिंबा नव्हे, असंही शिवसेनाप्रमुख म्हणाले.

Jun 30, 2012, 06:52 PM IST

प्रणवदा शिवसेनाप्रमुखांची भेट घेणार?

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी येत्या १३ तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

Jun 30, 2012, 09:29 AM IST

मराठवाडा नवा पाकिस्तान - बाळासाहेब ठाकरे

मराठवाडा हा नव्याने पाकिस्तानची कास धरत आहे. मराठवाड्याचे क्षेत्र हे पाकिस्तान होत आहे, अशी ठाकरी टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील संपादकीय लेखात केली आहे. 26/11 मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी लष्कर ए तैय्यबा हस्तक अबू जिंदाल तथा अबू हामजा हा मराठवाड्यातील आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे.

Jun 28, 2012, 09:21 AM IST

बाळासाहेबांचा अनेकांनी फायदा घेतला- राज ठाकरे

सर्वात जास्त बाळासाहेब ठाकरे मला समजले, हे मला माहिती आहे. कोऱ्या कागदावर त्यांनी सह्या केल्या म्हणून इतकी वर्षे लागलीत सत्ता यायला. त्यांच्या सह्या घेतलेल्यांनी त्यांचा किती फायदा घेतला आहे. ते पण मला माहिती आहे. तो माणूस किती सरळ आहे, भोळा आहे, याची मला कल्पना असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले.

Jun 20, 2012, 09:01 PM IST

काँग्रेस-सेना आतून सेटलमेंट- राज ठाकरे

काय आपल्याकडचे विरोधी पक्ष! काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देतात. याला विरोधीपक्ष म्हणतात? पाठिंबा देऊन वर सारवासारवीचे उत्तरं देतात. आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत नाही, प्रणवदांना पाठिंबा देत आहोत. का ते बंगाली आहे म्हणून का? असा जोरदार हल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेनेवर चढविला आहे.

Jun 20, 2012, 08:48 PM IST

'शिवसेना अफझलच्या फाशीची मागणी करेल का?'

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिल्यानं भाजप-सेनेत निर्माण झालेला तणाव कायम आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या भाजपच्या मागणीला शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Jun 20, 2012, 08:42 PM IST

सेनेत नासका आंबा नाही, उद्धवचा राजला टोला

शिवसेनेत एकही नासका आंबा नाही, अशी भाषणाची सुरूवात करून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Jun 20, 2012, 12:44 PM IST

शिवसेना @ 46

शिवसेनेच्या स्थापनेला आज ४६ वर्षं झाली. शिवसेनेला स्थापनेपासून संघर्ष करावा लागतोय. प्रत्येक राजकीय वादळात शिवसेना संपेल अशा वावड्या नेहमीच विरोधकांकडून उठवण्यात आल्या.. पण दरवेळी सर्व प्रश्नांना एकच उत्तर पुरेसे ठरते.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

Jun 19, 2012, 11:36 PM IST

सेना-काँग्रेस 'मैत्रीत', भाजप सापडलं 'कात्रीत'?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं या दोन पक्षांतल्या मैत्रीचा आणखी एक अध्याय लिहिला गेला आहे.... पाच वर्षांपूर्वी एनडीएच्या उमेदवाराविरोधात जाऊन शिवसेनेनं काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटलांना पाठिंबा दिला होता.

Jun 19, 2012, 03:49 PM IST