Video| महापालिका निवडणूक एकत्र लढणार का? ऐका उद्धव ठाकरेंचे थेट उत्तर
Uddhav Thackeray said we are all united as Mahavikas Aghadi
Aug 24, 2022, 08:20 AM ISTVideo| अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण
Amitabh bacchan Tested Corona positive
अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालीय. बिग बींनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिलीय. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी म्हटलंय. संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करुन घ्या, असं आवाहन अमिताभ बच्चन यांनी केलंय. याआधी जुलै 2020 मध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती.
Video| पावसाळी अधिवेशनाचे अखेरचे दोन दिवस; विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
last two days of the monsoon session of the legislature remaining, the opposition parties are likely to be aggressive
पावसाळी अधिवेशनात आज विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे... राज्यातल्या ढासळत्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधक राज्य सरकारला घेरणार आहेत. काल अधिवेशनात सत्ताधारी भाजपने मुंबई आणि परिसरातल्या मनपांच्या कारभारावर जोरदार टीका केली होती. त्या संदर्भात आज सरकारच्या वतीने गृहनिर्माणमंत्री फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देण्याची शक्यता आहे. यात मनपाच्या कारभारावर कारवाईची काही घोषणा करतात का याची उत्सुकता आहे. उद्या पावसाळी अधिवेशन संपतंय. त्यामुळे विरोधक आज सरकारची कोंडी करण्यासाठी मोठ्याप्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळेल.
Aug 24, 2022, 07:45 AM ISTVideo| हळदीचं पेटंट भारतालाच! बलाढ्य अमेरिकेला कायदेशी लढ्यात भारतानं हारवलं
Turmeric patent belongs to India; India defeated America in legal battle
हळदीच्या पेटंटबाबतचा कायदेशीर लढा भारताने जिंकलाय. २५ वर्षांपासून सुरू असलेला चिवट संघर्ष फळाला आला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे. जखमा ब-या करण्याच्या हळदीच्या औषधी गुणधर्मावर आधारित हा लढा होता. अमेरिकेने हे पेटंट घेतल्यावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी त्याला आव्हान दिलं. सीएसआयआरने त्यासाठी तब्बल 32 संदर्भ शोधून काढले. हे सर्व संदर्भ संस्कृत, हिंदी, उर्दूमधले होते. यातले काही संदर्भ 100वर्षे जुने होते.
Video| मंत्रालयाच्या गच्चीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न
Sucide Attempt On Terrece Of Mantralaya
- मराठा आरक्षणासाठी मंत्रालयावर शोले स्टाईल आंदोलन
- पोलिसांनी आंदोलकांना खाली उतरवलं
- विधिमंडळ अधिवेशन काळात धक्कादायक प्रकार
- मंत्रालय परिसरात आत्महत्यांचा प्रयत्न करण्याच्या घटना वाढल्या
- आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या दिवसभरात 4 घटना
- सकाळी जमिनीच्या वादातून एकानं पेटवून घेतलं
Video | संभाजीनगरमध्ये अडीच कोटीचा कुत्रा घोटाळा
2.5 crore dog scam in Aurangabad
भटके कुत्रे हा संभाजीनगर महापालिकेच्या डोक्याला ताप झालाय... धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय.. अशी पालिकेची बिकट अवस्था... कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना ठार मारता येत नाही... त्यामुळं नसबंदी करून कुत्र्यांची संख्या आटोक्यात राखण्याचा प्रयत्न महापालिका करते... मात्र २०१६ पासून गेल्या सहा वर्षांत कुत्र्यांच्या नसबंदीवर किती खर्च झाला, याची आकडेवारी पाहिली तर धक्का बसल्याशिवाय राहत नाही...
2015-16 मध्ये 672 कुत्र्यांच्या नसबंदीवर 4 लाख 20 हजार रुपये खर्च झाले
2016-17 मध्ये 307 कुत्र्यांसाठी 1 लाख 91 हजार रुपये,
2017-18 मध्ये 95 कुत्र्यांसाठी 67 हजार रुपये,
2018-19 मध्ये 3440 कुत्र्यांवर 30 लाख 96 हजार रुपये,
2019-20 मध्ये 4534 कुत्र्यांवर 43 लाख 7 हजार 300 रुपये,
2020-21 मध्ये 10681 कुत्र्यांवर 1 कोटी 1 लाख रुपये,
तर 2021-22 मध्ये 8824 कुत्र्यांवर 83 लाख रुपये
असे आतापर्यंत एकूण 2 कोटी 66 लाख रुपये नसबंदीवर खर्च झाले, अशी आकडेवारी माहिती अधिकारात समोर आलीय
Aug 23, 2022, 08:05 PM ISTVideo| पनवेल - कर्जत दुसऱ्या रेल्वे लाईनला केंद्राचा हिरवा कंदील
Panvel Karjat Second Line Will Start Early
रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर... कर्जत ते सीएसएमटी प्रवास २५ ते ३० मिनिटं कमी होण्याची शक्यता आहे. पनवेल कर्जत मार्गावर लवकरच दुसरी लाईन सुरू होणार आहे. त्यामुळे या मार्गावर लोकल सेवाही सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पनवेल ते कर्जत दरम्यानच्या वन विभागाच्या जमिनीवर दुसरी लाईन टाकण्यास केंद्राने परवानगी दिलीय. 2025 पर्यंत दुसरी लाईन बांधून पूर्ण होईल. त्यामुळे कर्जत पनवेलमार्गे नवी मुंबईशी लोकलसेवेने जोडलं जाईल. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी हा मार्ग अतिशय उपयुक्त ठरेल. पनवेल एअरपोर्टमुळे सध्या पनवेल आणि परिसराचा विकास झपाट्याने होतोय. या मार्गाच्या बांधणीमुळे 1800 झाडं कापावी लागणार आहेत.
Video| मूर्ती चोरीला गावकऱ्यांनी दिला अन्नत्यागाचा इशारा
The idol of God was stolen in Jalna
जालन्यातील जांब समर्थ इथल्या राम मंदिरातून 6 पंचधातूंच्या मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांची 7 पथकं आरोपींच्या शोधात रवाना झालीयत. मूर्ती चोरीला गेल्यानं आज सकाळची आरती होऊ शकली नाही. परवा मध्यरात्री मूर्ती चोरीला गेल्यानं जांब समर्थमधील नागरिक संतप्त झालेत. आज मूर्ती न मिळाल्यास उद्यापासून अन्नत्याग आंदोलन केल्या जाईल असा इशारा गावक-यंनी प्रशासनाला दिलाय.
Video| मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न!
Sucide Attempt Outside Of Mantralaya
मंत्रालयाबाहेर एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय...गावातल्या जमिनीच्या वादातून शेतक-याने पेटवून घेतलं...यात शेतकरी गंभीर जखमी झालाय...याबाबत गृहमंत्री फडणवीसांनी विधानसभेत निवेदन दिलंय...
Video| ऐका ब्लॅक होल चा आवाज...
Listen Sound Of Black Hole
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासानं प्रथमच कृष्णविवरामधला ध्वनी टिपलाय... कृष्णविवर किंवा ब्लॅक होल म्हणजे ज्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही, अशी तीव्र गुरूत्वाकर्षण असलेली अंतराळातील वस्तू... मात्र नासाच्या या संशोधनामुळे ही धारणा मोडित निघालीये. हे खगोलशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं संशोधन मानलं जातंय... या संशोधनाच्या आधारे आता ब्लॅक होलबाबत आणखी माहिती जमा करणं शक्य होणार असल्याचं मानलं जातंय.
Aug 23, 2022, 07:05 PM ISTVideo | महागाईसाठी तयार रहा? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फाटका
Gas And CNG Price Will Be Increased
-ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा चटका
-देशात गॅस आणि सीएनजीचे दर वाढणार?
-युरोप आणि रशियात तणाव वाढल्याचा परिणाम
-तणाव कमी न झाल्यास गॅस, सीएनजी महागणार
Video| 66 किलो सोन्याने मढलेल्या गणपतीचा 316 कोटींचा विमा
Insurance Of 316 Crore Rupees Of GSB Ganpati Bappa Jwellery
मुंबईतील किंग्ज सर्कल इथल्या GSB गणपती मंडळानं नवीन रेकॉर्ड केलाय...या वर्षी जीएसबी गणेश मंडळानं तब्बल 316 कोटींचा विमा उतरवलाय...या विम्यामध्ये 32 कोटींचे सोने, चांदी आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे...मंडळाचे स्वयंसेवक, पुजारी, आचारी, चप्पल स्टँडवरील कामगार, सुरक्षा रक्षकांसह इतर कामगारांसाठी 263 कोटींचा वैयक्तिक विमा मंडळाने उतरवलाय...
जीएसबी गणेश मंडळाकडून भक्तांचेही संरक्षण करण्यात आलंय...विशेष म्हणजे 66 किलो सोनं,
295 किलो चांदीसह मौल्यवान रत्नांनी मूर्ती मढवलीय..
Video| तुमच्या मुलांच्या शिक्षणावर किती खर्च?
How Much You Spend On Your Children Education
Aug 23, 2022, 06:45 PM ISTVideo | "सरकार सातवा वेतन देतं... ही कोणती पद्धत" अजित पवार अधिकाऱ्यांवर संतापले
Ajit Pawar is angry after Vidhan Sabha Mention As Vidhan Parishad
विधानसभेत आज अजित पवार चांगलेच अॅक्शन मोडमध्ये होते. लक्षवेधीच्या उत्तरामध्ये विधानसभाऐवजी विधानपरिषद उल्लेख केल्याने अजित पवार चांगलेच संतापले. अशा अधिका-यावर निलंबनाची कारवाई करा असं अजित पवारांनी सुनावलं. तर विधानसभेत लक्षवेधीवर बोलायला न मिळाल्याने नाराजी व्यक्त करणा-या अभिमन्यू पवारांनाही अजित पवारांनी समजावलं
Video| जखमी गोविंदा संदेश दळवीचा मृत्यू! राज्य सरकारकडून 10 लाखांचे मदत
Govinda Palyer Sandesh Dalavi No More Government Give Help Of 10 Lakh To His Family दहीहंडीवरून पडून मृत्यू झालेल्या मुंबईतल्या गोविंदाच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीय. जाहीर केल्याप्रमाणे विमा प्रक्रिया वेगाने शक्य नाही असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,
Aug 23, 2022, 06:15 PM IST