contravercy

भगवानगड वादाचा नवा अंक, नामदेव शास्त्रींच्या विधानांवर पंकजांचं सूचक मौन

भगवानगड वादाप्रकरणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेली माघार म्हणजे त्यांची राजकीय खेळी असल्याचे विधान भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलं आहे. गडाच्या विकासासाठीच आपण गादीवर बसलो असून कीर्तनकाराशिवाय इथं कोणाचाच आवाज निघणार नाही असंही नामदेवशास्त्री यांनी ठणकावलं आहे.

Apr 30, 2017, 09:25 AM IST

नागपूरचे महाराजबाग प्राणी संग्रहालय पुन्हा एकदा वादात

विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असलेले नागपूरचे महाराजबाग प्राणी संग्रहालय पुन्हा एकदा वादात सापडले आहे. या प्राणी संग्रहालयातीळ २५ अस्थायी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे येथील मुक्या प्राण्यांचे हाल होते आहेत.

Apr 14, 2017, 05:13 PM IST

अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या रणसंग्रामात थोरात-विखे वाद

जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून तालुक्याच्या ठिकाणाहून मतदान यंत्रासह मतदान साहित्य घेऊन कर्मचारी नेमणुक असलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.जिल्ह्यातील मतदान केंद्रावर या कर्मचार्‍यांना पोहोच करण्यासाठी एसटी बस, टेम्पो, जीप या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिये दरम्यान सर्व निवडणुक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आणि अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी. एच. पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकार्‍यांचे पथक तयार करण्यात आले आहे.

Feb 15, 2017, 05:39 PM IST

भाजप नेत्यांनंतर आता शिवसेना नेते वादात

खुद्द राज्याचे ग्रुहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी अतिक्रमण करुन घेतलेली जमीन अजूनही परत केली नसल्याचा आरोप, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे. या प्रकरणात गृहनिर्माण राज्यमंत्री वायकरांवर म्हाडा आणि मुंबई महानगरपालिका कारवाई कशी करणार, असा सवालही यावेळी संजय निरुपम यांनी केला. 

Jun 23, 2016, 06:19 PM IST

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

Jun 22, 2016, 10:20 PM IST

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

स्मार्ट सिटी योजनेवरून पुण्यात सुरवातीपासून वाद सुरू आहेत. त्यात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. स्मार्ट सिटी योजनेचा वर्षपूर्ती कार्यक्रम पुण्यात होत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दोन तासांच्या या कार्यक्रमासाठी पुणेकरांचे मात्र तब्ब्ल साडे तीन कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे. यातील पावणेदोन कोटी रुपये फक्त जाहिरातबाजीवर खर्च केले जाणार आहेत. काँग्रेस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या खर्चाला जोरदार आक्षेप घेतला आहे. 

Jun 22, 2016, 09:50 PM IST