election commission

भाजप सरकारवर बुमरॅंग, २७ गावांसह केडीएमसीची निवडणूक

निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला जोरदार तडाखा दिलाय. कल्याण-डोंबिवलीची निवडणूक वगळलेल्या २७ गावांसह होणार असल्याचे स्पष्ट केलेय. त्यामुळे भाजपला हा जोरदार दे धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Sep 10, 2015, 09:51 AM IST

संजय राऊतांना निवडणूक आयोगाची नोटीस

संजय राऊतांना निवडणूक आयोगाची नोटीस

May 7, 2015, 09:33 PM IST

शिवसेनेला 'कोंबडी' पडणार महागात, पेटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेस नेते नारायण राणेंचा पराभव झाल्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष करताना कोंबड्या आणल्या होत्या. त्यावर पेटाने आक्षेप घेतलाय. याबाबत निवडणूक आयोगाकडे पेटा तक्रार नोंदविणार आहे. त्यामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Apr 16, 2015, 02:17 PM IST

वोटर आयडी कार्ड 'आधार' शी जोडणार निवडणूक आयोग

मतदान ओळखपत्राला 'आधारकार्डाशी' जोडण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करीत असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. यामुळे मतदाराचे दोन्ही पद्धतीने विश्वनीय सत्यापन निश्चित करता येणार आहे. त्यामुळे बोगस मतदारांची समस्या संपू शकते.

Feb 27, 2015, 06:51 PM IST

जम्मू-काश्‍मिरात ७०, झारखंडमध्ये ६१.९२ टक्के मतदान

जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील १५ जागांसाठी ७० टक्के मतदान तर झारखंडमध्ये ६१.९२ टक्के झाल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उमेश सिन्हा यांनी दिली.  

Nov 25, 2014, 07:05 PM IST

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची तंबी

महाराष्ट्राच्या विकासासाठी माझ्या हातात सत्ता द्या. सत्तेत आल्यानंतर  केवळ मराठी मुलांनाच नोकऱ्या देऊ, परप्रांतीयांना एकही नोकरी देणार नाही, एवढेच नव्हे तर त्यांना राज्यात येऊ देणार नाही, असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठेवला आहे. 

Oct 21, 2014, 08:35 AM IST

जिलेबी-गाठिया भाजपच्या लोढांना महागात पडणार?

आज मतदान होतंय, पण अनेक उमेदवार कोणत्या ना कोणत्या कारणानं अडचणीत आले आहेत. असेच एक भाजपचे श्रीमंत आणि दिग्गज उमेदवार मंगलप्रभात लोढा. मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातील ते उमेदवार आहेत. निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानं लोढा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Oct 15, 2014, 05:42 PM IST

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस

परप्रांतियांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. 

Oct 13, 2014, 09:32 PM IST

अरोरा सिनेमागृहातल्या पाण्याच्या टाकीतून रोकड, मतदार यादी जप्त

मांटुग्यातल्या अरोरा सिनेमागृहातल्या पाण्याच्या टाकीतून दहा हजार रुपयांची रोकड आणि निवडणूक मतदार यादी जप्त करण्यात आलीय. 

Oct 10, 2014, 11:36 AM IST

सोशल मीडियाच्या वापरावर निवडणूक आयोगाचं लक्ष

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. राजकीय पक्षांप्रमाणे आता निवडणूक आयोगालाही या माध्यमाचं महत्त्व कळलंय.

Oct 9, 2014, 02:33 PM IST

भाजपचे उमेदवार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपचे उमेदवार राम कदम यांच्या विरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम कदम यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

Oct 7, 2014, 05:28 PM IST

गडकरींच्या ‘लक्ष्मीला नाकारू नका’ वक्तव्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलीय. त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवलाय. बुधवार संध्याकाळपर्यंत नोटीशीला उत्तर देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं गडकरींना दिले आहेत. 

Oct 7, 2014, 07:07 AM IST

निवडणुकीची अधिसूचना जारी, जागावाटपांचे गुऱ्हाळ!

महायुती आणि आघाडीचा जागावाटपांचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेच्या नव्या फॉर्म्युल्यावर भाजप विचार करतंय तर राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसनं फेटाळून लावलीय. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही गॅसवरच आहे. निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी झालीय. मात्र महायुती आणि आघाडीत जागावाटपाचा वाद सुरू असल्यामुळं उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब होत असून इच्छूक आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. 

Sep 20, 2014, 04:42 PM IST