इरमा चक्रीवादळाचं कॅरेबियन बेटांवर थैमान सुरूच,किमान 17 जणांचा मृत्यू
अटलांटिक महासागरात उठलेल्या शतकातल्या सर्वात मोठ्या इरमा चक्रीवादळानं अनेक कॅरेबियन बेटं उध्वस्त केलीयेत. या वादळात आतापर्यंत किमान 17 जणांचा बळी गेला असून सुमारे 12 लाख लोकांना वादळाचा फटका बसल्याचा अंदाज आहे. मात्र हा आकडा थेट 26 लाखांपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज आहे.
Sep 8, 2017, 10:10 PM IST