illigal abortion

औरंगाबादमध्ये अवैध गर्भपाताचा अड्डा उघड

 गर्भपाताचा अड्डा गेली तीन वर्ष राजरोसपणे औरंगाबादमध्ये सुरु होता अशी धक्कादायक माहिती पुढं आली आहे, दरम्यानच्या काळात या ठिकाणी 100 पेक्षा जास्त गर्भपात केल्याचं शक्यता वर्तवण्यात येते आहे.  महत्वाचं म्हणजे गर्भपात केंद्र चालवणा-या डॉ. चंद्रकला गायकवाड, या महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी आहेत. सोबतच सध्या त्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेत मेडिकल अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, सोबतच अवैध गर्भपात केंद्रच्या तपासणी समितीवर सुद्धा त्यांनी या आधी काम केल्याचं उघड झाल आहे.

May 27, 2017, 03:10 PM IST