भारत विरूद्ध इंग्लंड वन-डे सिरी़ज
Aug 27, 2014, 09:08 PM ISTस्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लड (दुसरी वन डे)
पहिला सामना पावसाने रद्द झाल्यानंतर आज दुसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला...
Aug 27, 2014, 03:13 PM ISTमाजी खेळाडूंकडून कोच फ्लेचर टार्गेट, धोनीवर प्रश्नचिन्ह
मुंबईः इंग्लड विरुद्ध ओव्हलमध्ये पाचव्या आणि अंतिम टेस्टमध्ये भारताचा डाव आणि २४४ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर माजी खेळाडूंनी कोच डंकन फ्लेचरला हटविण्याची मागणी केली आहे. तसेच कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या मानहानीकारक पराभवानंतर फ्लेचरच्या भूमिकेवर टीका करताना त्यांचे योगदान शून्य होते त्यांना हटविण्याची वेळ आल्याचेही म्हटले आहे.
Aug 18, 2014, 07:41 PM ISTभारतीय क्रिकेटपटूंमुळं देशाची मान शरमेनं झुकली - सुनील गावस्कर
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि इतर भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळं भारताची मान शरमेनं झुकली आहे, अशी खरमरीत टीका माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी केली आहे. 'ज्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळण्यात रस नाही, त्यांनी टेस्ट संघातून बाहेर पडले पाहिजे,' असा सल्लाही त्यांनी खेळाडूंना दिला आहे.
Aug 18, 2014, 01:34 PM ISTधोनी कॅप्टन्सी सोडणार? पराभवानंतर दिले संकेत
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ असा दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं आता कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहे. या पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का? या प्रश्नावर उत्तर देताना 'आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा' असं सूचक विधान महेंद्रसिंह धोनीनं केलंय.
Aug 18, 2014, 01:12 PM ISTटीम इंडियाचे बॅट्समन आणि बॉलर्स सीरिजमध्ये फेल
पाचव्या आणि शेवटच्या ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झालाय. एक डाव आणि 244 रन्सनं कॅप्टन कुकच्या इंग्लंड टीमकडून भारतीय टीमचा मानहानीकारक पराभव झालाय.
Aug 17, 2014, 09:42 PM ISTस्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड (पाचवी टेस्ट)
भारत वि. इंग्लंड तिसऱ्या टेस्टला ओव्हल मैदानात सुरूवात झालीय. टीम इंडियाची कामगिरी फारच खराब सुरू आहे. इंग्लंडनं 2-1ची आघाडी घेतलीय. आजच्या मॅचकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत.
Aug 15, 2014, 04:44 PM IST“बरं झालं आता आरामाला दोन दिवस मिळाले”- धोनी
मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडनं धुव्वा उडवलाय. तीन दिवसातच टीम इंडियाचा इंग्लंडनं एक इनिंग आणि 54 रन्सनी दारुण केलाय. टीम इंडियाचे शेर तीन दिवसात ढेर झाले. या पराभवामुळे सीरिजमध्ये भारत 2-1 ने पिछाडीवर आहे.
Aug 10, 2014, 08:01 AM ISTभारताचा इंग्लंडकडून एक डाव, 54 धावांनी पराभव
भारत विरूध्द इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा 1 डाव आणि 54 धावांनी इंग्लंडकडून पराभव झाला. भारताचे आघाडीचे खेळाडूंना चांगला खेळ करण्यात सपशेल अपयशी ठरलेत. इंग्लंडच्या बॉलरसमोर नांगी टाकली.
Aug 9, 2014, 11:25 PM ISTअँडरसननं धोनीलाही केली शिवीगाळ
भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अॅँडरसन यानं अत्यंत घाणेरडय़ा शब्दांत संबोधल्याचं वृत्त आहे. रवींद्र जडेजाचे दात तोडण्याची धमकी दिल्याचाही आरोप अँडरसनवर करण्यात आला होता. यामुळं तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
Aug 6, 2014, 01:16 PM ISTतिसऱ्या टेस्टमध्ये पराभव, ट्विटरवर विराट-अनुष्काची खेचली
इंग्लडविरोधात तिसऱ्या कसोटी सामन्या टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. या पराभवाला क्रिकेट फॅन्सने क्रिकेटरांपेक्षा बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्माला जास्त जबाबदार धरले आहे. टीम इंडियाचा २६६ धावांननी पराभव झाला आणि ट्विटरवर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीवर अनेक जोक्स शेअर झाले.
Aug 1, 2014, 07:47 PM ISTस्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड (तिसरी टेस्ट)
मुंबई: भारत वि. इंग्लंड तिसऱ्या टेस्टला साऊथहॅम्पटन इथं सुरूवात झालीय. लॉर्ड्स टेस्टवर 28 वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळवणारी भारतीय टीम सीरिजमधील इंग्लंडविरूद्धची आघाडी 2-0 नं वाढवण्यास उत्सुक आहे. तर दुसरीकडे घरचा आहेर मिळालेली इंग्लिश टीम आपलं नाक वाचवण्यासाठी नव्या प्लानिंगसह मैदानात उतरलीय. इंग्लंडची पहिले बॅटिंग आहे.
Jul 27, 2014, 03:58 PM ISTटीम इंडिया इंग्लिश टीमचं नाक कापणार?
भारत वि. इंग्लंड तिसऱ्या टेस्टला साऊथहॅम्पटन इथं आजपासून सुरूवात होणार आहे. लॉर्स्द टेस्टवर 28 वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळवणारी भारतीय टीम सीरिजमधील इंग्लंडविरूद्धची आघाडी 2-0 नं वाढवण्यास उत्सुक असेल. तर दुसरीकडे घरचा आहेर मिळालेली इंग्लिश टीम आपलं नाक वाचवण्यासाठी नव्या प्लानिंगसह मैदानात उतरणार आहे.
Jul 27, 2014, 08:49 AM ISTधोनी ब्रिगेडनं करून दाखवलं!
इंग्लंड विरूध्दच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियानं 95 रन्सनं विजय मिळवत नवा इतिहास रचलायं. तब्बल 28 वर्षांनी टीम इंडियानं लॉर्डसवर विजय मिळवत पाच टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये 1-0 नं आघाडी मिळवलीयं.
Jul 21, 2014, 08:33 PM ISTधोनीची कॅप्टनसी काढून घ्यायला हवी- चॅपेल
'टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा उमेदीचा काळ संपलाय. तो आता टेस्ट क्रिकेटचं नेतृत्व करण्याच्या कामाचा नाही. त्यामुळं भारताच्या कसोटी संघाची सूत्रं त्याच्याकडून काढून ती विराट कोहलीकडं द्यायला हवीत. ती वेळ आली आहे,' असं सडेतोड मत ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन इयान चॅपेल यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं भारतीय क्रिकेटमध्ये नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Jul 15, 2014, 04:37 PM IST