marathwada

मराठवाड्यात संपाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी आक्रमक

संपाच्या दुसऱ्या दिवशी बाजार उठविण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे माहुर तालुक्यातील धानोडा फाटा येथे शिवामृताची गाडी अडवून दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या आहेत. 

Jun 2, 2017, 11:10 AM IST

सेनेच्या 'शिवसंपर्क' अभियानाचा मराठवाड्यात फज्जा

मराठवाड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानाचा फज्जा उडाला आहे. 

May 13, 2017, 08:08 PM IST

मराठवाडा, प. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सूर्यनारायण कोपला

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. तर उत्तर महाराष्ट्रसह विदर्भात सूर्यनारायण कोपला आहे. दरम्यान, राज्यात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

May 6, 2017, 11:54 PM IST

शेतकरी चार दिवसांपासून तूर विक्रीसाठी ताटकळत

 सरकारच्या आश्वासनानंतरही तूर खरेदी झालेलीच नाही. सरकारकडून आदेश नसल्याने तूर खरेदी रखडली आहे. खरेदी केंद्रांसमोर शेतकरी अजूनही रांगेतच उभा आहे. तूर उत्पादक शेतक-यांना सरकार दिलासा देणार का, असा प्रश्न उपस्थित करुन ४ दिवसांपासून शेतकरी तूर विक्रीसाठी ताटकळत ठेवल्याने संताप व्यक्त होत आहे.

Apr 26, 2017, 05:13 PM IST

मराठवाडा, विदर्भात आज महापालिकेसाठी निवडणूक

लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिकेसाठी आज निवडणूक होतेय. 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार रिंगणात आहेत. 

Apr 19, 2017, 08:46 AM IST

मराठवाड्यातील हुंड्याचे रेटकार्ड... तुम्हांला भोवळ येईल...

मराठवाड्यातील लग्नातील हुंड्याचे रेटकार्ड पाहिल्यावर भल्या भल्याला भोवळ येईल अशी परिस्थीती आहे.... पाहूयात कसे आहे रेटकार्ड

Apr 17, 2017, 05:49 PM IST

मराठवाड्यात अवकाळी पावसानं ७९ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान

मराठवाड्यामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानं जवळपास ३७० गाव आणि शिवाराला झोडपलंय. यामध्ये ७९ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक पंचनाम्यातून समोर आलंय. अवकाळी आणि गारपिटीनंतर तब्बल आठवड्याभरानंतर औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात प्राथमिक अहवाल पूर्ण झालाय. हा आकडा प्राथमिक असून पूर्ण पंचनामे झाल्यानंतर नुकसानीचा आकडा अधिक वाढणार आहे.

Mar 23, 2017, 08:39 AM IST

मराठवाड्यात पुन्हा गारपीट, शेतकरी चिंतेत

लातूर शहरासह जिल्ह्यातल्या निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या काही भागांत मध्यरात्री आणि पहाटे अवकाळी पाऊस पडला. 

Mar 15, 2017, 05:54 PM IST

मराठवाड्यात मोठ्या उत्साहात मतदान

जिल्हापरिषदेसाठी आज मराठवाड्यातही मोठ्या उत्साहात मतदान झालं. काँग्रेस राष्ट्रवादीची पारंपारिक बालेकिल्ले ताब्यात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपची जोरदार लढाई रंगल्याचे चित्र संपूर्ण मराठवाड्यात दिसले. 

Feb 16, 2017, 06:59 PM IST