municipal elections

नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी आज मतदान

 नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी थोड्याच वेळात मतदान होत आहे. ८१ जागांसाठी ५७८ उमेदवार रिंगणात असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Oct 11, 2017, 08:21 AM IST

महापालिका निवडणूक : माजी महापौरांसह पाच नगरसेवकांना केले पोलिसांनी हद्दपार

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध जोरदार  मोहीम उघडली आहे. माजी महापौरांसह पाच विद्यमान व चार माजी नगरसेवकांना एक महिन्यासाठी मालेगाव शहर आणि तालुक्यातून  हद्दपार केल्याची कारवाई केली आहे. 

May 4, 2017, 09:27 PM IST

मनसेची आज दुसरी बैठक, राज ठाकरे यांची उपस्थिती नाही!

काल चिंतन बैठकीत उमटलेले महापालिका निवडणुकीतील पराभवाचे पडसाद आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांडूनच होत असलेली नेते-सरचिटणीस फेरबदलाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनसेची तातडीची बैठक होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार नाहीत.

Apr 22, 2017, 08:37 AM IST

शून्यातून भाजप सत्तेत, अभिनेता रितेशचा प्रचार तरीही काँग्रेस फ्लॉप

गतवर्षी येथे भाजपची एकही जागा नव्हती. त्यामुळे शून्यातून सत्तेत भाजप बसला आहे. तर दुसरीकडे स्टार प्रचारक म्हणून अभिनेता रितेश देशमुख प्रचारात उतरला होता. मात्र, याचा प्रभाव मतदारांवर पडलेला नाही.  

Apr 21, 2017, 01:34 PM IST

दिल्ली महापालिका निवडणुकीत मराठी उमेदवार रिंगणात

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. पूर्व दिल्लीतील बाबरपूर या वॉर्डातून मराठी उमेदवार निवडणूक लढवत आहे. 

Apr 19, 2017, 10:18 AM IST

मराठवाडा, विदर्भात आज महापालिकेसाठी निवडणूक

लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिकेसाठी आज निवडणूक होतेय. 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार रिंगणात आहेत. 

Apr 19, 2017, 08:46 AM IST

पालिका निवडणूक : काँग्रेस होर्डिंग्ज लातूरमध्ये चर्चेचा विषय

पालिका निवडणूक जसजशी जवळ येते आहे. तस तसा प्रचाराला नवा रंग चढू लागला आहे. यंदाच्या प्रचारात शहरात काँग्रेसनं झळकावलेली होर्डिंग्ज हा सर्वच पक्षांसाठी टीका टिप्पणीचा प्रमुख मुद्दा बनलाय.

Apr 13, 2017, 03:20 PM IST

चंद्रपूर मनपाच्या निवडणुकीत बंडखोरी, काँग्रेसमध्ये सर्वाधिक लागण

आगामी 19 तारखेला होऊ घातलेल्या चंद्रपूर मनपाच्या निवडणुकीत 66 वॉर्डांसाठी सुमारे 800 उमेदवार आहेत. बंडखोरीच्या भीतीने अनेक पक्षांनी शेवटपर्यंत आपल्या याद्या जाहीर करणं टाळले तरीही बंडखोरी व्हायची ती झालीच.

Apr 4, 2017, 10:10 PM IST

भाजपला मतदान न करण्याचा मराठा मूक मोर्चाचा निर्णय

मराठा आरक्षणाला उशीर होत असल्याने भाजपला धडा शिकविण्याचा निर्णय मराठा मूक मोर्चाने घेतला. भाजपला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय मराठा मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आलाय. 

Feb 18, 2017, 01:01 PM IST

मनसेची दादरमध्ये निवडणूक समारोप प्रचार सभा

शिवसेनेनं दादरमधील दत्ता राऊळ मैदानावरचा हक्क न सोडल्याने अखेर मनसेची प्रचाराच्या समारोपाची सभा कबुतरखाना जावळे मार्गावर होणार आहे.

Feb 17, 2017, 12:33 PM IST

मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच : उद्धव ठाकरे

कोणी कितीही पारदर्शकतेचा विचार केला तरी आमची कामात  पारदर्शकता आहे. जे (भाजप) हा मुद्दा मांडत आहेत, त्यांच्याकडे किती आहे, असा प्रश्न उपस्थित करुन मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकणारच, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी वडाळ्यातील सभेत केला.

Feb 11, 2017, 09:42 PM IST

भाजपला साथ दिली तर दिव्याचा विकास : मुख्यमंत्री फडणवीस

भाजपच्या हाती सत्ता दिली तर दिव्यातलं डंपिंग ग्राऊंड बंद करूच तसेच इथे विकासकामे केली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवावासियांना दिले आहे. 

Feb 11, 2017, 08:09 PM IST

भाजप हा गुंडांचा पक्ष झालाय, सुसंस्कृत पुण्यात गुंड कशाला हवेत? : नारायण राणे

भाजप हा गुंडांचा पक्ष बनला आहे. पुणे सुसंस्कृत शहर आहे, अशा शहरात भाजपला गुंड का लागतात?, असा सवाल नारायण राणे यांनी सावल उपस्थित केला. 

Feb 10, 2017, 09:59 PM IST

राज्यात २१ फेब्रुवारी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

  मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून २१ फेब्रुवारी मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Feb 9, 2017, 10:55 PM IST