narayan rane

ब्लॉग : राणे गाता गजाली!

दिल्लीत सोमवारचा दिवस लक्षणिय ठरला, तो दोन घटनांमुळे... एकीकडे भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तर दुसरीकडे नारायण राणे यांची 'दिल्ली'वारी...

Sep 27, 2017, 08:27 PM IST

नारायण राणेंची मंत्रीपदी वर्णी लागणार पण...

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा राजकीय भवितव्य ठरवण्यासाठीचा दस-याचा मुहुर्त टळणार असल्याचं स्पष्ट झालंय. राणे आता १ ऑक्टोबरला आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र राणेंची मंत्रीमंडळात निश्चितपणे वर्णी लागणार आहे. मात्र भाजपात प्रवेश करून की स्वतंत्र पक्ष स्थापन करून याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.

Sep 27, 2017, 06:41 PM IST

राणे दसऱ्याला आपला निर्णय घेतील - चंद्रकांत पाटील

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि नारायण राणे यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. शाह यांनी राणेंना दोन्ही बाजू समजावून सांगितल्यात. त्यामुळे पुढचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार राणेंचा असून ते दस-याला आपला निर्णय घेतील असं विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

Sep 27, 2017, 01:10 PM IST

राणेंना हॉस्पीटलची गरज - कदमांचा टोला

नारायण राणे आणि अमित शाहांच्या भेटीबद्दल कदमांनी जोरदार टोला हाणलाय. राणेंचं हॉस्पिटलच्या उद्घाटनासंबंधी काम होतं, असं म्हणत राणेंना हॉस्पिटलची गरज असल्याची कोपरखळी हाणली.

Sep 26, 2017, 07:14 PM IST

नारायण राणेंना भेटण्याआधी अमित शाहा बोलले असं काही...

भाजप अध्यक्ष अमित शाह आणि नारायण राणे यांची दिल्लीत रात्री भेट झाली. परंतु भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी भेटीला जाण्यापूर्वी गाना सुनने जा रहा हू हे सूचक वाक्य शाह बोलून गेले. यावरून गाणी म्हणजे राणेंचे गा-हाणे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Sep 26, 2017, 05:23 PM IST

राणे नवा पक्ष काढणार?, दिल्लीवारी निष्फळ

 नारायण राणे यांच्या पुढील राजकीय वाटचाली संदर्भात अद्यापही संभ्रम कायम आहे. काल राणेंनी दिल्लीत जाऊन भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासह राज्यातील वरिष्ठ भाजप नेत्यांशी चर्चा केली. मात्र या दिल्लीवारी नंतरही राणेंचा भाजप प्रवेश अद्याप निश्चीत झालेला नाही.  

Sep 26, 2017, 01:39 PM IST

राणेंविरोधात पोस्टरबाजी, शिवसेना प्रवक्त्यांविरोधात गुन्हा दाखल

नारायण राणेंविरोधातली पोस्टरबाजी शिवसेना नेत्याच्या अंगलट आली आहे.  राणेंविरोधात पोस्टरबाजी केल्यानंतर शिवसेनेचे अरविंद भोसले यांच्यावर वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Sep 26, 2017, 11:23 AM IST