nashik

कांद्याचा प्रश्न पेटलाच कसा! शेतकऱ्यांच्या संपापासून केंद्राच्या निर्णयापर्यंत; वाचा, नेमकं काय घडलं!

Onion Issue : कांद्याचं निर्यातशुल्क 40टक्के केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झालेत. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रानं नाफेडमार्फत 2 लाख मेट्रीक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतलाय. मात्र यातून कांद्याची कोंडी फुटणार का? हा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतोय. 

Aug 22, 2023, 06:28 PM IST

'कांदा परवडत नसेल तर खाऊ नका', शिंदे सरकारमधील नेत्याचं विधान; म्हणाले 'एवढं काय बिघडतंय'

कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संतप्त पडसाद उमटत असताना शिंदे सरकारमधील नेत्याने अजब विधान केलं आहे. "ज्याला कांदा परवडत नाही त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडतं?', असं ते म्हणाले आहेत. 

 

Aug 21, 2023, 04:01 PM IST

वॉकीटॉकी, टॅब, मोबाईल! राज्यातल्या तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी... पोलिसही हैराण

राज्यभरात तलाठी पदाची भरती परीक्षा सुरु आहे. गुरुवारपासून या परीक्षेला सुरुवात झाली. पण नाशिक जिल्ह्यात तलाठी परीक्षेसाठी बसलेल्या एका महिला उमेदवाराने हायटेक कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॉपीचा प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. 

Aug 18, 2023, 06:29 PM IST
Pimpalgaon Agriculture produce market committee tomato price rate will fall PT52S

Nashik | ग्राहकांना दिलासा! टोमॅटोच्या बाजारभावात घसरण

Pimpalgaon Agriculture produce market committee tomato price rate will fall

Aug 17, 2023, 11:55 AM IST

'राहुल गांधी यांचं आडनाव 'खान', ही फिरोज खानांची पिलावळ' शरद पोंक्षेंचं वक्तव्य

नाशिकमध्ये भारतीय विचार मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर जोरदार टीका केला. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शरद पोंक्षे यांनी त्यांचं आडनाव गांधी नसून खान असल्याचं म्हटलं आहे. 

Aug 16, 2023, 02:38 PM IST

पुण्यानंतर आता नाशिक, चांदवडमध्ये चक्क 'या' कर्मचाऱ्याने दिल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना काल पुणे आणि बुलडाण्यात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता नाशिकमध्येही दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. चांदवड टोलनाक्यावरचे हे कर्मचारी असून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

Aug 16, 2023, 01:55 PM IST

यालाच स्वातंत्र्य म्हणतात का? मानवी साखळी करत नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ... आदिवासींची व्यथा

देशाने गेल्यावर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. आता मोठ्या उत्साहात 76 वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होईल. पण या 76 वर्षात आदिवासी आणि गोरगरीब समाजाला खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का?  अलिशान वैभव सोडा, सध्या मुलभूत सुविधा तरी यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत का?

 

Aug 14, 2023, 06:32 PM IST
NIA Raids Kolhapur Nashik Ichalkaranji And Arrested Three in terror activity links PT1M13S

शिक्षण क्षेत्रातल्या आणखी एका मोठा घोटाळ्याचा पर्दाफाश, पॅथोलॉजी लॅबसाठी चक्क बोगस प्रमणापत्रांचं वाटप

राज्यात शिक्षण क्षेत्रातले घोटाळे कमी होताना दिसत आहेत. नोकरीचं आमिष दाखवून अनेक तरूणांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली. तर आमदार रोहित पवार यांनी विधानसभेतशिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराचं रेट कार्डचं वाचून दाखवलं. आता शिक्षण क्षेत्रातील आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. 

Aug 10, 2023, 04:27 PM IST