निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज चौथ्या दिवशी मागे घेतला. डॉक्टरांनी रुग्णांना वेठीस धरत संप पुकारला होता. आज मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी करण्यात आली. त्यावेळी संप मागे घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. तसेच सुरक्षा करण्याबाबत राज्य सरकारला स्पष्ट शब्दात बजावले.
Mar 23, 2017, 12:57 PM ISTनिवासी डॉक्टरांना इशारा, 6 महिन्यांचा पगार कापणार!
निवासी डॉक्टरांना इशारा, 6 महिन्यांचा पगार कापणार!
Mar 22, 2017, 07:29 PM ISTनिवासी डॉक्टरांना इशारा, 6 महिन्यांचा पगार कापणार!
डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर राज्यातील निवासी डॉक्टकांनी सामूहिक रजेचे आंदोलन सुरु केले आहे. यामुळे राज्यात आरोग्य सेवेवर याचा परिणाम झालाय. त्यामुळे डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घ्यावे. आपल्या मागण्या पूर्ण केल्या जातील तसे लेखी आश्वासन दिले आहे. आंदोलन मागे न घेतल्यास 6 महिन्यांचा पगार कापण्यात येईल, असा स्पष्टा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलाय.
Mar 22, 2017, 01:33 PM ISTराज्यातील निवासी डॉक्टरांचे दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरुच, रुग्णांचे हाल
राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या सामुहिक रजेचा आजचा दुसरा दिवस आहे. सरकारी रुग्णालायत होणाऱ्या डॉक्टरांचवरच्या हल्ल्यांची वाढती संख्या आणि सुरक्षेच्या वानवा यामुळे संताप्त डॉक्टरांनी सामूहिक रजेचा मार्ग निवडलाय. डॉक्टरांचं काम बंद असल्यानं रुग्णांचे चांगलेच हाल होत आहेत.
Mar 21, 2017, 10:49 AM ISTअर्थमंत्र्यांचे नातेवाईक डॉक्टरांवर कारवाई नाही, राज्यातील निवासी डॉक्टर संपावर
मार्डच्या निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. उद्या संपूर्ण महाराष्ट्रात मार्डच्या निवासी डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नातेवाईक असलेल्या डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचे मार्डचा आरोप आहे.
Nov 25, 2015, 10:34 PM ISTनिवासी डॉक्टरांनी धरली राज्याची आरोग्य यंत्रणा वेठीस
आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारत ४००० निवासी डॉक्टरांनी राज्याच्यी आरोग्य यंत्रणा वेठीला धरली आहे. त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तरीही डॉक्टर संपावर गेलेत, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Jul 2, 2015, 01:37 PM ISTनिवासी डॉक्टर पुन्हा एकदा संपावर
निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलंय. सुमारे ४००० डॉक्टरांनी आता संपाची हाक दिलीय. ते २ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
Jul 1, 2015, 03:07 PM IST