मुंबई : मार्डच्या निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. उद्या संपूर्ण महाराष्ट्रात मार्डच्या निवासी डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नातेवाईक असलेल्या डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचे मार्डचा आरोप आहे.
१७ मेडिकल कॉलेजेसमधील साडेचार हजार विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. नागपूर मेडिकल कॉलेजच्या डॉ. व्यवहारे यांच्यावर कारवाई करावी, अशी मार्डची प्रमुख मागणी आहे. डॉ. व्यवहारे यांच्या जाचाला कंटाळून एका निवासी डॉक्टरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा त्यांच्यावर आरोप आहे.
मात्र, डॉ. व्यवहारे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं मार्डच्या डॉक्टरांचं म्हणणे आहे. उद्या सकाळी दहा वाजता मार्डच्या पदाधिकाऱ्यांची वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेंची बैठक होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.