"ज्या विषयातलं कमी कळतं, त्यावर मोदींनी बोलू नये!"
परराष्ट्र धोरणावर नरेंद्र मोदींनी टीका केल्याबद्दल परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. ज्या विषयातलं ज्ञान मर्यादित आहे, त्याबद्दल बोलू नये, असा टोमणा मारत खुर्शीद यांनी मोदींना ‘सल्ला’ दिला आहे.
May 13, 2013, 04:37 PM IST`राहुल गांधी काँग्रेसचे सचिन तेंडुलकर`
राहुल गांधी काँग्रेसचे ‘सचिन तेंडुलकर’ असल्याचं काँग्रेस नेते आणि परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी ‘झी न्यूज’शी बोलताना म्हटलंय.
Nov 16, 2012, 03:43 PM ISTखुर्शिदांच्या बालेकिल्ल्यात आज केजरीवालांचा हल्लाबोल
परराष्ट्र सलमान खुर्शीद यांचा मतदारसंघ फारुखाबादमध्ये अरविंद केजरीवाल आजपासून आंदोलन करणार आहेत. सकाळीच केजरीवाल आपल्या समर्थकांसह फारुखाबादमध्ये दाखल झालेत.
Nov 1, 2012, 11:34 AM ISTकायदेमंत्र्यांची केजरीवालांना रक्तपाताची धमकी!
वारंवार होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे काँग्रेसची अवस्था बिकट होत असल्याचं दिसू लागलंय. केजरीवालांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं कोंडीत सापडलेल्या केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीदांचा संयम अखेर सुटला. नेहमी अहिंसेची भाषा करणारे कायदेमंत्री सलमान खुर्शीद यांनीच केजरीवालांना धमकी देत रक्तपाताची भाषा केली आहे.
Oct 17, 2012, 04:37 PM IST१७ ऑक्टोबरला केजरीवालांचा आणखी एक धमाका
केंद्रीय कायदेमंत्री सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर धरणं आंदोलनाला बसलेल्या अरविंद केजरीवाल यांनी आपलं आंदोलन सध्या तरी थांबवण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 15, 2012, 06:17 PM ISTकोणत्याही चौकशीला सामोरे जाऊ - खुर्शीद
आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे प्रति आव्हान केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी दिले आहे. इंडिया अगेस्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी खुर्शीद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, खुर्शीद यांनी केलेला खुलासा योग्य नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Oct 14, 2012, 07:24 PM ISTखुर्शीद हिम्मत असेल तर येऊन दाखवा- केजरीवाल
हिम्मत असेल तर सलमान खुर्शिद यांनी जंतर-मंतर इथं येऊन आपल्याशी जाहीर वादविवाद करावा, असं आव्हान अरविंद केजरीवाल यांनी दिलंय.
Oct 14, 2012, 01:30 PM ISTसोनिया-राहुल यांना आव्हान म्हणजे हत्तीशी टक्कर!
आज अण्णा हजारे जंतर मंतरवर उपोषणाला बसल्यापासून गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गेले चार दिवस टीम अण्णांच्या उपोषणाच्या आंदोलनाची हेटाळणी करणाऱ्य़ा काँग्रेसलाही आता त्याची दखल घेणं भाग पडलं आहे.
Jul 29, 2012, 06:52 PM ISTअण्णा आणि खुर्शिद यांची गुप्त भेट
अण्णा हजारेंनी कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्याबरोबर गुप्त भेट झाल्याचं मान्य केलंय. त्यामुळं आता नवा वाद निर्माण झालाय. पारदर्शकतेचा आग्रह धरणा-या अण्णांच्या गुप्त भेटी कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.
Jul 18, 2012, 11:03 PM ISTमाझ्या वक्तव्याचा विपर्यास - खुर्शीद यांची सारवासारव
केंद्रीय कायदेमंत्री सलमान खुर्शीद यांनी आपल्या ‘काँग्रेसला नवीन विचारधारेची गरज’ असल्याच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं त्यांनी म्हटलंय.
Jul 10, 2012, 03:37 PM ISTकाँग्रेसला नवीन विचारधारेची गरज - खुर्शीद
पक्षासाठी शेवटचं आशास्थान असलेल्या राहुल गांधी यांनी जबाबदारी स्विकारण्याची गरज आहे. मात्र, ते जबाबदारी स्विकारत नाहीत, असं कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटलंय. काँग्रेसला नवीन विचारधारेची गरज असल्याचं खुर्शीद यांनी यावेळी म्हटलंय.
Jul 10, 2012, 11:38 AM ISTपदभारातून मुक्त करा, चार मंत्र्यांची इच्छा
केंद्रात सत्तेत असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या चार कॅबिनेट मंत्र्यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त करत राजीमाना देण्याची तयारी दर्शविली आहे. यात काँग्रेसचे वरिष्ठ नेता वायलर रवि, सलमान खुर्शीद, गुलाम नबी आझाद आणि जयराम रमेश यांचा समावेश आहे. त्यामुळे आता सरकारसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
Apr 24, 2012, 06:19 PM ISTसिंघवींच्या बचावासाठी खुर्शीद मैदानात
कथित सीडी वादावर भाजपने अभिषेक मनु सिंघवींकडून संसदेत स्पष्टीकरण मागितल्यावर कायदे मंत्री सलमान खुर्शीद सिंघवींच्या मदतीला धावून आले आहेत. हा मुद्दा संसदेत उपस्थित होणं योग्य नाही. याऐवजी देशातील जनतेच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होणं जास्त महत्तवाचं आहे. असं खुर्शीद म्हणाले.
Apr 24, 2012, 05:14 PM ISTसलमान खुर्शीद यांचं मंत्रिपद जाणार?
निवडणूक आयोगानं पाठवलेल्या नोटीसनंतरही वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्यावरील कारवाईसंबंधी स्वतः पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगच निर्णय घेण्याची शक्यता आहे. खुर्शीद प्रकरणाची दखल घेऊन पंतप्रधान सोमवारी एक बैठक घेण्याचीही शक्यता आहे.
Feb 13, 2012, 10:20 AM IST'...आणि सोनिया गांधी रडल्या'
उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे एका प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रडल्या. सोनिया गांधी रडल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनीच दिली आहे.
Feb 10, 2012, 06:49 PM IST