samachar

राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र फरक सांगणारा भन्नाट दस्त'ऐवज'

हिमालयापासून दक्षिणेतील हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या आपल्या भारतवर्षातील लोकांमध्ये भारतीयत्वाची एक भावना आहे. आपली समान संस्कृती आहे. त्यातील तत्त्व एकच आहे. यामुळेच आपल्यावर अनेक आक्रमणे होऊनही आपल्यातील एकत्वाची भावना डळमळली नाही. आपली संस्कृती, आपली जीवनशैलीच आपल्या राष्ट्राचे खरे चैतन्य आहे. सांस्कृतिक राष्ट्र हीच भारताची खरी ओळख आहे व त्यामुळेच ते कित्येक शतके चैतन्यपूर्ण संघटन म्हणून टिकून राहिले आहे. 

Feb 26, 2018, 06:41 PM IST

Video : मापात पाप, पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांला नागरिकांचा चोप व्हिडिओ वायरल

मापात पाप करणाऱ्या एका पेट्रोल पंपावरील कामगाराला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत आहे.  शेरू सिंग असे कामगाराचे नाव आहे.   

Feb 20, 2018, 11:10 PM IST

सर्वात कमी वयाचा राशिद खान बनला नंबर १ गोलंदाज, पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकला टाकले मागे

  अफगाणिस्तान टीमचा स्टार स्पिनर राशिद खान आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर वन डे रँकिंगमध्ये क्रमांक १ चे स्थान पटकावले आहे. पण पहिला क्रमांक त्याला भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहसोबत शेअर करावा लागत आहे. झिम्बाव्बे विरूद्ध सिरीजमध्ये त्याने १६ विकेट घेतल्या. त्यामुळे त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दोघांची रेटिंग सध्या ७८७ अंक आहेत. यासोबत राशिद खानने आपल्या नावावर एक रेकॉर्ड केले आहे. 

Feb 20, 2018, 10:31 PM IST

रॅम्बोच्या मृत्यूची बोंबाबोंब... पण

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता सिल्वेस्टर स्टेलॉनच्या मृत्यूची सोशल मीडियावर अफवा पसरली आहे. त्यामुळे अशा चुकीच्या बातमीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन स्वतः रॅम्बोने म्हणजे सिल्वेस्टरने केले आहे. 

Feb 20, 2018, 08:12 PM IST

इंडोनेशियात सिनाबंग ज्वालामुखीचा उद्रेक, पाहा भयाण परिस्थिती...

  इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर सोमवारी माऊंट सिनाबंग ज्वालामुखीत मोठा स्फोट झाला. यामुळे सुमारे पाच हजार मीटरच्या उंचीचा राखेचा ढग बनला आणि त्यातून लाव्हा बाहेर पडू लागला. 

Feb 20, 2018, 05:52 PM IST

परब फिटनेसचा सुजल पिळणकर मुंबई श्री

  दृष्ट लागण्याजोगं झालेलं दिमाखदार आयोजन आणि शरीरसौष्ठवपटूंची पीळदार शरीरयष्टी पाहून तहानभूक विसरलेल्या तब्बल पाच हजार क्रीडाप्रेमींना मुंबई श्रीचा पीळदार आणि दमदार थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. एकापेक्षा एक खेळाडू असलेल्या मुंबई श्रीच्या जेतेपदाच्या लढतीत परब फिटनेसच्या सुजल पिळणकरने फॉर्च्युन फिटनेसच्या सकिंदर सिंग आणि आर.एम.भट जिमच्या सुशांत रांजणकरवर मात केली आणि आपल्या स्वप्नवत जेतेपदावर यशाची मोहोर उमटविली. तसेच फिजीक्स फिटनेस प्रकारात प्रथम बागायतदार आणि रोहन कदम यांनी बाजी मारली.

Feb 20, 2018, 05:38 PM IST

मोठी खुशखबर : पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या आजचा भाव

  पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने घट दिसून येत आहे. रोज होणाऱ्या बदलामुळे पेट्रोलचे भाव ८१ च्या घरात गेले होते. आता पेट्रोल ७९ रुपयांपर्यंत खाली आहे.  मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या दरात १९ पैसे आणि डिझल १६ पैसे स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल झाल्याने ही घट दिसून आली आहे. एक्सपर्टनुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रीत होऊ शकतात. पेट्रोलचा दर तीन वर्षांच्या निच्चांकी स्तरावर पोहचला आहे. 

Feb 20, 2018, 04:19 PM IST

माजी क्रिकेटर म्हणाला, चहल-कुलदीपने धोनीचे पाया पडायला पाहिजेत...

  दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात जाऊन ४-१ ने मात देणाऱ्या टीम इंडियाच्या विजयात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या मोठा हात आहे.  सिरीज जिंकण्याचा इतिहास भारतीय संघाने केला आहे. या स्पीनर जोडीने आफ्रिकेला नामोहरम केले. या दोघांच्या फिरकीमध्ये आफ्रिकन फलंदाज पूर्णपणे फसले. 

Feb 15, 2018, 05:10 PM IST

राज ठाकरेंनी घेतला व्यंग्यचित्रातून संघाचा समाचार...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच भारतीय लष्कराबद्दल केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंग्यचित्रातून टोकदार भाष्य केले आहे.  राज ठाकरेनी आपल्या फेसबूक पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट केले असून ते सध्या खूप व्हायरल होत आहे. यात सरसंघचालक यांच्या वक्तव्याची टर उडवली आहे. 

Feb 14, 2018, 08:40 PM IST

चहलने केली कमेंट, तर रोहितची पत्नी रितिकाने दिले हे जबरदस्त उत्तर

  भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा नेहमी टीमच्या युवा क्रिकेटरची चांगली खेचत असतो. पण आता तो विचित्र परिस्थिती अडकला आहे. रोहितने पोस्ट केलेल्या एका फोटोवर स्पिनर युजवेंद्र चहल याने रोहितची पत्नी रितिकावर एक कमेंट केली. पण रितिकानेही त्याचे शानदार उत्तर दिले. त्यानंतर फॅन्सच्या कमेंटचा पूर आला. 

Feb 2, 2018, 06:24 PM IST

१९ वर्षीय तरूणीवर सिनेमा थिएटरमध्ये बलात्कार

  गेल्या सोमवारी हैदराबाद येथील एका सिनेमागृहात एका १९ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली.  या घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीला पकडले असून सिनेमागृहाच्या मालकाविरूद्ध कारवाई केली आहे. 

Feb 2, 2018, 04:36 PM IST

viral video :गलिच्छ बिळांची सफर केल्यानंतर साबणाने अंघोळ करणारा उंदीर

गेल्या आठवड्यात चहा पिणारी एक पाल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता या आठवड्यात एक साबणाने अंघोळ करणारा उंदीर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jan 29, 2018, 04:55 PM IST

विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला, भाजपचे तिरंगा रॅलीने उत्तर

संविधान धोक्यात असल्याचा आरोप करत संविधान बचाव रॅलीच्या बॅनरखाली देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. उद्या प्रजासत्तादिनी सर्व विरोधी पक्ष मिळून मुंबईत संविधान बचाव रॅली काढणार आहेत. १५ दिवसांपूर्वी विरोधकांनी या रॅलीची घोषणा केल्यानंतर भाजपानेही या रॅलीला उत्तर देण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन केलं आहे. उद्या मुंबईत या दोन्ही रॅलीने राजकीय वातावरण मात्र तापणार आहे.

Jan 25, 2018, 11:04 PM IST

अफगाणिस्तानने रचला इतिहास, पहिल्यांदा अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये

  फिरकी गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने यजमान न्यूझीलंडला गुरूवारी २०२ धावांनी पराभूत केले. या शानदार आणि ऐतिहासिक विजयामुळे अफगाणिस्तान अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. 

Jan 25, 2018, 09:17 PM IST

धोनी आफ्रिकेसाठी रवाना, सोबत दिग्गज क्रिकेटरची मुलं..

  टेस्ट सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया आता आपल्या सर्वात यशस्वी कर्णधाराची आठवण काढत आहे. हो आम्ही बोलतोय महेंद्रसिंग धोनीबद्दल.

Jan 25, 2018, 07:56 PM IST