चार दिवसात एसटीचे तब्बल १२० कोटी रुपयांचे नुकसान
ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा चौथाा दिवस असून या चार दिवसात एसटीचे तब्बल १२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Oct 20, 2017, 12:50 PM ISTएसटी संपावर तोडगा निघणार, उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला एसटीचा संप मिटण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केलेय.
Oct 20, 2017, 11:13 AM ISTएसटी संपामुळे रेल्वेवर ताण, लांबपल्ल्याच्या गाड्यांना जादा डबे
राज्यातील एसटी संपाचा ताण आता रेल्वे सेवेवर आलाय. एसटी गाड्या नसल्याने लोकांनी रेल्वेचा आसरा घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने संपामुळे प्रवाशांची वाढती गर्दी पाहून जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला.
Oct 20, 2017, 11:10 AM ISTएसटीच्या संपात मुख्यमंत्री करणार हस्तक्षेप?
बोलणीच पुढे होत नसल्याने आजही डेडलॉक कायम आहे. संपाचा चौथा दिवस असून संपावर तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संपावर तोडगा काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू टाकण्यात आलाय. दरम्यान, आता एसटीच्या संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 20, 2017, 10:30 AM ISTसंपाचा चौथा दिवस, तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाचा चौथा दिवस उजाडला तरी संपावर तोडगा निघत नाही. ऐन दिवाळीत सुरु असलेल्या संपामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दिवाळी सण असल्याने मुंबईतील चाकरमानी दिवाळीसाठी गावाला निघालाय. मात्र एसटी नसल्याने या सगळ्यांनी खासगी गाड्यांची वाट धरली आहे.
Oct 20, 2017, 08:48 AM ISTएसटी संप : राज्यात प्रवाशांचे हाल आणि त्यात प्रवाशांची लूट
संपामुळे एसटीची सेवा पूर्णत: ठप्प आहे. रत्नागिरीत सेवा कोलमडली असून कोल्हापुरात संपामुळे प्रवाशांचे हाल तर होतातच आहेत. त्याशिवाय प्रवाशांची लूटही सुरु झालीय. खासगी बसेसनी अव्वाच्या सव्वा दर आकारायला सुरुवात केलीय. तर अहमदनगर येथे स्कूल बसचा आधार घेण्यात आलाय.
Oct 19, 2017, 03:58 PM ISTएसटी संप : उद्धव ठाकरे गप्प का ?
एसटीचा संप तिसऱ्या दिवशी सुरुच आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले अनेक लोक दिवाळीसाठी घरी पोहोचू शकलेले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अशावेळी नेहमी अग्रणी असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गप्प का, असा सवाल केला जात आहे.
Oct 19, 2017, 02:58 PM ISTएसटी संपामुळे दोन दिवसात ५० कोटींचे नुकसान
एसटीचा संप आज तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. या संपाचा मोठा आर्थिक फटका बसलायाय. संपाच्या दोन दिवसांत एसटीचे ४५ ते ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता आजपासून एसटीचे कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तसे संकेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेत.
Oct 19, 2017, 01:13 PM ISTएसटी कामगार कर्मचारी संपात फूट?, ८ गाड्या पोलीस बंदोबस्तात रवाना
एस टी कर्मचारी संपात फूट पडल्याचे दिसत आहे. भोर एसटी डेपोतून ८ गाड्या मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
Oct 19, 2017, 11:12 AM ISTकर्मचाऱ्यांना वाढवायला पगार नाही, पण उधळपट्टी भरपूर...
पगारवाढीवरून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला असताना आता एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी एसटीमध्ये झालेल्या उधळपट्टीची चर्चा करतायत.
Oct 18, 2017, 07:20 PM ISTएसटी कामगारांचा संप चिघळणार, कारवाईचा सरकारचा इशारा
महाराष्ट्र एसटी कामगार संघटना व कृती समितीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारलाय. त्याचा परिणाम जाणवत आहे. दरम्यान, एसटीचा संप चिघळणार, अशी चिन्हं आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर रुजू व्हावं, अन्यथा कारवाई करू, असा इशारा सरकारनं दिलाय.
Oct 17, 2017, 02:31 PM ISTपुणे । कर्मचा-यांच्या बंदला १०० टक्के प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 10:13 AM ISTएसटीचा संप मागे, दिवाकर रावते यांची मध्यस्ती
२५ टक्के पगारवाढ देण्यात यावी या मागणीसाठी काल पुकारलेला एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप आज मागे घेतला. त्यामुळे प्रवाशांचे कालपासून होणारे हाल टळण्यास मदत झालेय.
Dec 18, 2015, 03:09 PM ISTराज्यातील एसटीचा संप सुरुच, प्रवाशांचे होतायेत हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2015, 10:42 AM ISTएसटी कर्मचारी संपात फूट, लाखो प्रवाशांना संपाचा फटका
राज्यभरातल्या एसटी कर्मचा-यांनी पगार वाढीच्या मागणीसाठी संप पुकारलाय. याचा फटका लाखो प्रवाशांना बसला आहे. दरम्यान, कल्याणमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे. वरिष्ठ पातळीवर बोलणी चालू असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी आंदोलन घेतले मागे. प्रवाशांना त्रास नको म्हणून कर्मचारी कामावर परतले. त्यामुळे संपात फूट पडल्याचे चित्र आहे.
Dec 17, 2015, 03:41 PM IST