सोशल नेटवर्किंग विरोधात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून महापुरुषांची होणारी बदनामी, त्यानंतर समाजात निर्माण होणारा तणाव थांबविण्यासाठी नाशिक शहरातील विद्यार्थी प्रतिनिधींनी पुढाकार घेतलाय.
Jun 20, 2014, 09:25 PM ISTमेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकाकडून 30 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार
ठाण्यात कळव्यामधल्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एका प्राध्यापकानं जवळपास 30 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचं समोर आलंय. विद्यार्थिनींनी यासंदर्भात डरपोक स्टुडन्स या बनावट मेलद्वारे ठाणे पोलीस आयुक्त आणि रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केलीय.
Jun 10, 2014, 12:06 PM ISTबारावीचा आतापर्यंतचा सर्वाधिक 90.3 टक्के निकाल, कोकण अव्वल!
बारावीचा निकाल जाहीर झालाय. यंदा आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजेच 90.3 टक्के एवढा बारावीचा निकाल लागलाय. यंदाही मुलींनीच बाजी मारलीय. सर्वच विभागामध्ये मुली अव्वल आहेत. तर विभागांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागलाय.
Jun 2, 2014, 12:30 PM ISTऐका हो ऐका: आज ‘12 वी’चा ऑनलाईन निकाल!
आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येईल. बारावीच्या विद्यार्थांना हा निकाल ऑनलाईन बघता येईल. हा निकाल www.mahreslult.nic इन या वेबसाईटवर पाहता येईल. तर 10 जून रोजी विद्यार्थ्यांना मार्कशिट देण्यात येतील.
Jun 2, 2014, 08:37 AM ISTविद्यार्थीनींवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा
चीनमध्ये एका प्राथमिक शाळेत शिक्षकानं जवळपास 11 विद्यार्थिनींवर बलात्कार आणि छेडखानी केल्याच्या आरोप होता. या शिक्षकाला प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. गाओ दाओशेंग (59) वरील गुन्हा सिद्ध झालाय. तो वुवेई काउंटी शाळेत शिक्षक आहे.
Apr 23, 2014, 11:02 PM ISTविद्यार्थ्यांची कमाल, आता भिंतीवर धावणार रेसिंग कार
आता तो दिवस काही दूर नाही जेव्हा भिंतीवर रेसिंग कार पळतांना दिसेल. एका नव्या संशोधनानुसार जमिनीच्या ९० अंशाच्या कोनात एका विशेष ट्रॅक डिझाइनसोहत रेसिंग कार चालवली जावू शकते.
Mar 20, 2014, 01:09 PM ISTयूएसमध्ये शीख विद्यार्थ्यांना म्हटलं जातंय दहशतवादी
शीख विद्यार्थ्यांनी सांगितलं की कशाप्रकारे त्यांच्या मित्राच्या पगडीचं हसू केलं जातं आणि जबरदस्ती ती काढण्याचा प्रयत्न केला जातो. हा धक्कादायक प्रकार आहे यूएसमधला. शीख विद्यार्थ्यांना ओसामा बिन लादेन किंवा दहशतवादी म्हणत आपल्या देशात परत जा, अशाप्रकारचा त्रास दिला जातोय.
Mar 19, 2014, 03:51 PM ISTशाळेनेच केले जातीच्या आधारावर विद्यार्थ्याला बहिष्कृत
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधल्या एसव्हीपीएम शाळेत जातीच्या आधारावर विद्यार्थ्याला बहिष्कृत करण्याचा धक्कादायक प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सुरु आहे. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात मुलाच्या पालकांनी आमरण उपोषण सुरु केलंय.
Dec 19, 2013, 09:55 PM ISTबस ड्रायव्हरच्या प्रसंगावधामुळं चिमुकल्यांचे प्राण वाचले
अंधेरीमध्ये आज मोठा अपघात होता होता वाचला. मिल्लत शाळेची बस जोगेश्वरीकडून अंधेरीकडे जात होती. सीएनजीवर चालणाऱ्या या बसमध्ये स्पार्किंग झालं.
Dec 14, 2013, 04:27 PM ISTआश्रमशाळेत प्रशिक्षण, धूम ३ स्टाईलने चार विद्यार्थी जखमी
चंद्रपूर जिल्ह्यातील एका दिवंगत माजी मंत्र्याच्या परिवाराच्या खासगी आश्रमशाळेत धूम ३ ने धुमाकूळ घातलाय. आश्रमशाळेतील या धूम ने ४ विद्यार्थ्यांना थेट रूग्णालयात पोहचलंय. आश्रमशाळेतील अधीक्षकाच्या पित्याने नव्या को-या चारचाकी वाहनाचे प्रशिक्षण सुरु केले होते. ते आता त्यांच्या अंगलट आलं आहे.
Dec 8, 2013, 02:44 PM ISTमदरशांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
राज्यातील मदरशांना १० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. आता मदरशांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्वृत्ती देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Nov 4, 2013, 11:02 PM ISTशिक्षिकेचा घृणास्पद प्रकार, मूकबधिर विद्यार्थांकडून मॉलिश
मुकबधिर मुलं चेपतायत शिक्षिकेचे पाय
विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातंय अशैक्षणिक काम
विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातंय पायांना मालिश
विद्यार्थ्यानेच उघड केला हा प्रकार
Oct 27, 2013, 10:21 PM ISTडेंग्यू मुंबईच्या मानगुटीवर, विद्यार्थी विनाकारण रस्त्यावर!
मुंबईत डेंग्युचं थैमान सुरू आहे. मुंबईत डेंग्युचे रूग्ण वाढत आहे.पाचजणाचा डेंग्यु बळी गेल्याचं मुंबई महापालिकेचा अहवाल सांगत आहे. या डेंग्युला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने शाळेच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थांना रस्त्यावर उतरवलं आहे.
Oct 16, 2013, 08:34 AM ISTविद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, मंत्र्यांचं आश्वासन
आरोग्य विज्ञान विघापीठानं दुहेरी पेपर तपासणी सुरू केल्यामुळं विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये नाराजी आहे. पेपर दोघांकडून तपासून घेऊन त्याची सरासरी काढण्याची पद्धत विद्यापीठानं सुरू केलीये. यामुळे मेडिकलचे तब्बल ११ हजार ९०० विद्यार्थी नापास झालेत. त्यामुळं ही पद्धत बदलण्याची मागणी जोर धरतेय. मार्डनंही याविरोधात संपाची हाक दिलीये.
Oct 14, 2013, 08:29 PM ISTआता उंदीर, बेडुक, झुरळं कापण्यावर बंदी?
बारावीतील विद्यार्थी उंदीर , बेडूक , झुरळ , गांडूळ या आणि अन्य प्राण्यांच्या डिसेक्शन प्रात्यक्षिकावर बंदी प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावलीय.
Oct 1, 2013, 06:41 PM IST