राष्ट्रवादीत का झाला बदल?
Jun 25, 2014, 08:56 PM ISTसुनील तटकरे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होणार याचे संकेत आधीच देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष निवडण्यात आले आहेत. सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय.
Jun 25, 2014, 02:29 PM ISTराष्ट्रवादीत फेरबदल, भास्कर जाधव यांची उचलबांगडी?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. लोकसभेतील दारूण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना राष्ट्रीवादीने बदल करण्याचे निश्चित केलेय. त्यासाठी विद्यमान भास्कर जाधव यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. नव्याने गृहमंत्री आर आर पाटील अथवा जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची निवड अपेक्षा आहे. त्यांची नावे आघाडीवरआहेत.
Jun 18, 2014, 12:28 PM ISTरायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे, घड्याळ विरुद्ध घड्याळ!
रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे अशी एक रंगतदार लढत रंगणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत रंगणार आहे. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला अपक्ष म्हणून सुनील शाम तटकरे या नावाच्या व्यक्तीनंही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे इथं एक वेगळीच रंगत निर्माण केलीय.
Apr 9, 2014, 03:44 PM ISTरायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे रिंगणात
जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना रायगडमधून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी तटकरेंच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे रायगडमध्ये अनंत गीतेंची तटकरेंशी लढत रंगणार आहे.
Mar 13, 2014, 05:45 PM ISTतटकरे-जाधव वाद केवळ चार भिंतीत मिटला, रत्नागिरीत वाद कायम
कोकणातील राष्ट्रवादीच्या दोन मात्तबर नेत्यांमधला वाद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मिटवला खरा. पण या दोन नेत्यांच्या वादात ज्या कार्यकर्त्यांनी उड्या घेतल्या त्यांच्यातील वाद मात्र अजून मिटलेला दिसत नाहीय.
Jan 17, 2014, 07:57 AM ISTजाधव-तटकरे यांची कानउघडणी, पवारांचा समझोता यशस्वी
गेले अनेक महिने राष्ट्रवादीचे नेत भास्कर जाधव आणि जलसंपदा मंत्री सुनील टकरे यांच्यातील शितयुद्ध टोकाला गेल्याने जाहीर थेट आरोप-प्रत्यारोप झालेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्य़ावर आला. उमुख्यमंत्री अजित पवार यांनी भास्कर जाधव यांनी समजावले होते. मात्र, वाद काही मिटेना. त्यामुळे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांना मध्यस्ती करावी लागली. त्यांनी दोघांची चांगलीच कानउघडनी केल्याचे सांगण्यात येत आहे.
Dec 3, 2013, 05:41 PM ISTजाधव - तटकरे यांच्यातला संघर्ष शिगेला, पवारांचा हस्तक्षेप
कोकणातल्या राष्ट्रवादीचे २ दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय. हे दोन नेते एकमेकांना पाण्यात पाहत असताना आता त्यांच्यातला वाद मिटवण्यासाठी पवारांना हस्तक्षेप करावा लागतोय.
Dec 3, 2013, 12:19 PM ISTजाधव vs तटकरे, राष्ट्रवादीच्या खेड कार्यालयाला ठोकले टाळे
माजी मंत्री आणि विद्यमान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यातील शीत युद्ध आता अधिकच चव्हाट्यावर आले आहे. भास्कर जाधव यांनी तटकरे समर्थक विद्यमान खेड तालुकाध्यक्षांची उचलबांगडी केल्याने वादत अधिक भर पडली. त्याचवेळी तटकरे समर्थक कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयाला टाळे ठोकले.
Nov 23, 2013, 02:46 PM ISTतटकरे प्रकरणी तपास यंत्रणांवर हायकोर्टाचे ताशेरे!
सुनील तटकरेंच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा तपास अत्यंत बेजबाबदारपणे केल्याचे ताशेरे हायकोर्टानं ओढलेत. आर्थिक गुन्हे शाखेसह सर्वच यंत्रणांनी तपासात हलगर्जीपणा दाखवल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. किरीट सोमय्या यांनी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.
Oct 2, 2013, 11:25 AM ISTराज सभेला गर्दी होते म्हणून यशस्वी नाही होणार- तटकरे
राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. केवळ सभांना गर्दी होते म्हणजे यशस्वी झालो, असं होत नसल्याचं तटकरेंनी म्हटलं आहे.
Mar 2, 2013, 06:45 PM ISTराष्ट्रवादीचे मंत्री जाधव-तटकरे आमने-सामने
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे विश्वासू आणि कोकणातील नेते जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यातील वाद उफाळून आला आहे. जाधव यांनी तटकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, हा प्रयत्न जाधवांनाच अडचणीत आणणारा ठरण्याची शक्यता आहे.
Dec 6, 2012, 04:21 PM ISTउद्धव ठाकरेंना सुनील तटकरेंचा टोला
अजित पवारांच्या राजीनाम्याच्या धाडसामागे मंत्रालयाला लागलेली आग कारणीभूत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी उत्तर दिलंय.
Oct 5, 2012, 04:55 PM IST'भुजबळ - तटकरेंविरोधात ढीगभर पुरावे'
राज्याचे बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. मात्र, या आरोपात तथ्य नसल्याचे सांगून किरीट सोमय्या यांचे आरोप भुजबळ आणि तटकरे यांनी फेटाळले होते. त्यानंतर सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेत ढीगभर पुरावे सादर केले आहेत.
Aug 1, 2012, 01:14 PM ISTसुनील तटकरेंचा ‘हवाला’शी संबंध?
जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वेगवेगळ्या कंपन्यांची स्थापना करून त्यामाध्यमातून हवाला आणि मनी लॉन्ड्रींगचे व्यवहार केल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलाय.
Jul 13, 2012, 09:26 AM IST