सुवर्णकन्यांना अजूनही बक्षिसाची रक्कम नाहीच
भारताच्या महिला टीमनं कबड्डीचा पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. त्या तीन खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत केली होती. मात्र, तीन महिन्यानंतरही खेळाडूंना बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही.
May 22, 2012, 03:54 PM ISTकबड्डीच्या मराठी सुवर्णकन्यांना १ कोटी
विश्वविजेत्या महिला कबड्डीपट्टूंना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे निर्णय आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.
Mar 7, 2012, 06:31 PM ISTउपमुख्यमंत्र्यांनी केलं महिला कबड्डीपटूंचं अभिनंदन
सुवर्णा बारटक्के,अभिलाषा म्हात्रे, दीपिका जोसेफ या महाराष्ट्राच्या तीन वर्ल्ड कप विजेत्या कबड्डीपटूंनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी या तीघींचही यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं.
Mar 7, 2012, 08:37 AM IST