मुंबई : सरकारने आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरसोबत लिंक करणे अनिवार्य केलं आहे. यासाठी ६ फेब्रुवारी २०१८ ही शेवटची तारीख असेल.
या तारखेपर्यंत जर तुम्ही फोन नंबर आधारसोबत लिंक केला नाही तर तुमचा नंबर डिअॅक्टीवेट केला जाईल. सुप्रीम कोर्टाने आधारसोबत बॅंक अकाऊंट्स आणि मोबाईल नंबर लिंक करण्यावर स्टे आणण्यास नकार दिलाय. त्यामुळे हे करणे आता अनिवार्य झाले आहे. गेल्या काही दिवसात सरकारने ही लिंकिंग प्रोसेस सोपी केली आहे. चला जाणून घेऊया या महत्वाच्या गोष्टी....
नुकत्याच करण्यात आलेल्या घोषणेनुसार ६ फेब्रुवारी २०१८ च्याआधी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांकासोबत लिंक करावा लागेल. ज्या नंबर्ससोबत आधार क्रमांक लिंक केलेला नसेल ते नंबर्स बंद केले जातील.
ग्राहकांना दिलासा देत यूनिक आयडेटिफिकेशन अथॉरिटीने घोषणा केली की, ग्राहक आपला आधार क्रमांक मोबाईल नंबरसोबत लिंक करण्यासाठी १ डिसेंबरपासून OTP चा वापर करू शकतील. म्हणजे एसएमएस किंवा IVRS कॉल किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून ग्राहक लिंकसाठी रिक्वेस्ट टाकू शकतील. UIDAI ने एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘१ डिसेंबर २०१७ पासून तुम्ही विना टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरांशिवाय आधार नंबर सीमसोबत जोडता येईल’.
मोबाईल ग्राहक हे ऑनलाईन करू शकणार नाहीत. म्हणजे तुमच्याकडे एक एखादी इंटरनेट लिंक आली आणि ते मोबाईलला आधारसोबत जोडण्याचा दावा करत असेल, तर त्यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.
मोबाईल धारकाला केवळ आपला आधार नंबर आणि अॅक्टिव्ह सीम कनेक्शन घेऊन जावं लागेल. त्यानंतर E-KYC री-व्हेरिफिकेशन करावं लागेल.
टेलिकॉम ऑपरेटरांना आदेश देण्यात आलाय की, वरिष्ठ नागरिकांच्या व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी त्यांच्या घरी जावे लागेल. DoT नुसार, वेबसाईटवर लिंक किंवा आणखी कशाप्रकारे त्यांना जनतेला सांगावं लागेल की, जर कुणी आजारी किंवा त्यांना चालता येणं शक्य नसेल अशांसाठी घरापर्यंत जावं लागेल.
जर एखादा एजन्ट तुमचं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करत असेल तर टेलिकॉम कंपनीला लक्ष द्यावं लागेल की, ते ग्राहकांचे पूर्ण e-KYC डिटेल्स बघू शकणार नाहीत. एका नव्या गाईडलाईननुसार, एजन्टच्या डिव्हाईसवर कोणताही डेटा स्टोर होणार नाही.
आधार आणि मोबाईल लिंक करण्यासाठी तुम्हाला पैसे देण्याची गरज पडणार नाही. ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे.
एकापेक्षा अधिक नंबर्स ठेवणा-या ग्राहकांना प्रत्येक मोबाईल कनेक्शनसाठी वेगळं बायोमेट्रीक व्हेरिफिकेशन करावं लागेल.