Whatsapp News Marathi: मागील काही दिवसापासून जगभरातील अनेक प्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारीकपात केली आहे. ट्विटर, फेसबुक, अॅमेझॉननंतर आता व्हॉट्सअॅपमध्येही नोकरकपातीला सुरुवात झाली. भारताच्या दोन प्रमुख आणि मोठ्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. याआधी ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचे मालक एलॉन मस्क यांनीदेखील ट्विटरमधील अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
व्हॉट्स अॅप इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस (Abhijit Bose, head of WhatsApp India) यांनी राजीनामा दिलाय. तर मेटा (Meta) कंपनीचे पब्लिक पॉलिसी हेड राजीव अग्रवाल (Rajeev Aggarwal) यांनीही आपला राजीनामा कंपनीला सोपवलाय. शिवनाथ ठुकराल यांच्यावर मेटाच्या पब्लिक पॉलिसीची जबाबदारी देण्यात आलीय. मेटा कंपनीने मंगळवारी याची माहिती दिलीय. नुकताच मेटाचे भारतातले प्रमुख अजीत मोहन (Ajit Mohan) यांनीही राजीनामा दिला होता.
दरम्यान जगप्रसिद्ध असलेल्या या कंपन्यांकडून कर्मचारीकपात का केली जात आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र फक्त मेटा आणि ट्विटर (Meta and Twitter) या दोन कंपन्यांनीच आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलेले नाही. जगातील अनेक नावाजलेल्याा कंपन्यांनी कर्मचारीकपातीचा निर्णय घेतलेला आहे किंवा तसा विचार या कंपन्यांकडून केला जात आहे. जाणून घेऊया जगातील कोणकोणत्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतलेला आहे.
परिणामी फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच व्हॉट्सअॅपने (Facebook, Instagram and WhatsApp) कर्मचारीकपातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी 13 टक्के किंवा 11 हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार असे जाहीर केले होते. महसुलामध्ये मोठी घट झाल्यामुळे मेटाने हा निर्णय घेतलेला आहे.
वाचा: श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबच्या हातावर....; पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर
कर्मचारी कपातीचा निर्णय का घेतायत?
कोरोनाच्या (corona) काळात लॉकडाऊनमुळे (Lockdown) लोक घरातच बसून होते. त्या काळात लोक इंटरनेटवर जास्त वेळ घालवायचे. या काळात ते समाजमाध्यमं वापरायचे, ऑनालईन वेगवेगळ्या गोष्टी पाहायचे तसेच ऑनलाईन खेळदेखील खेळायचे. याच काळात मनुष्यबळाची गरज वाढल्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणत कर्मचारी भरती करण्यात आली. मात्र लोक आता घराबाहेर पडत असल्यामुळे हे सर्व कमी झाले आहे. मनुष्यबळाची गरजही कमी झाली. लोक घराबाहेर पडून कार्यालय तसेच इतर कामांत व्यस्त आहेत. परिणामी या कंपन्यांची मिळकतही कमी झालेली आहे आणि या टेक कंपन्यांना सांभाळण्यासाठी कमी मनुष्यबळाची गरज भासत आहे.
आतापर्यंत कोणकोणत्या कंपन्यांकडून कर्मचारीकपात?
अब्जाधीश एलॉन मस्कने (Elon Musk) ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साईट खरेदी केल्यानंतर या कंपनीत मोठ्या प्रमाणात कर्मचारीकपात करण्यात आली. तर फेसबूक या समाजमाध्यमाच्या मेटाने आतापर्यंत 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अॅपल या कंपनीने अद्याप कर्मचाऱ्यांची कपात केलेली नाही. मात्र या कंपनीने नव्याने कर्मचारी भरती करण्याचे प्रमाण कमी केले आहे.