नवी दिल्ली : आपली ग्राहक संख्या सतत वाढवण्यासाठी, आपल्या ग्राहकांच्या समस्या व्यवस्थित ऐकून घेण्यासाठी, ई-कॉमर्स साईट देखील सोशल मीडियाचा आधार घेत असतात. ट्वीटरवर अॅमेझॉन या ऑनलाईन वेबसाईटकडून एक मजेदार उत्तर एका मुलीला देण्यात आलं, अॅमेझॉनने त्या मुलीला लिहिलं, आख्खा इंडिया जान ता है हम तुम पे मरता है, दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है. यानंतर या मुलीच्या उत्तराआधीच ही बातचीत ट्रोल होत गेली, लोकांनी यावर वेगवेगळे कमेंन्ट करण्यास सुरूवात केली.
ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनच्या हेल्प ट्विटर हॅण्डलवर Aditii (@Sassy_Soul_) नावाच्या मुलीने लिहिलं 'हाय, अॅमेझॉन, तुम्ही स्वत:ला जगातील सर्वात मोठी ऑनलाईन वेबसाईट म्हणतात, पण खूप वेळानंतर माझ्या पसंतीची वस्तू तुमच्याकडे मिळाली नाही. यावर अॅमेझॉन हेल्पकडून ट्वीटरवर उत्तर आलं, आम्ही ग्राहकांच्या गरजा नेहमीच समजून घेत असतो, आम्ही आमच्या सामानाची लिस्ट देखील दिवसेंदिवस वाढवत असतो, तेव्हा आपण सांगू शकता का, तुम्हाला नेमकं काय पाहिजे?
अॅमेझॉनने याचं लगेच उत्तर दिलं...
यावर आदिती नावाच्या मुलीने उत्तरात लिहिलं, बस एक सनम चाहिए, आशिकी के लिए. यानंतर अॅमेझॉन ट्वीटर अकाऊंट हॅण्डल करणाऱ्या व्यक्तीने लिहिली, जान तेरे नाम चित्रपटाच्या गाण्याची एक लाईन. अॅमेझॉनने लिहिलं, ये अख्खा इंडिया जानता है हम तुमपे मरता है, यानंतर हा संवाद आणि प्रश्न उत्तर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले.