मुंबई : अॅन्ड्रॉईडच्या पुढच्या व्हर्जनच्या नावाचा सस्पेन्स आता संपुष्टात आलाय. 'अॅन्ड्रॉईड पी' अथवा 'अॅन्ड्रॉईड पाय' असं या नव्या व्हर्जनचं नाव असेल. या नवीन व्हर्जनचं अपडेट सध्या गूगलच्या स्मार्टफोन 'पिक्सल'मध्येच उपलब्ध होईल.
'अॅन्ड्रॉईड पी'मध्ये डिजिटल वेलबिईंग एक डॅशबोर्ड आहे... हे एक जेस्चर आधारित नेव्हिगेशन सिस्टम आहे. त्यामुळेच 'डिजिटल वेलबिईंग' सध्या जोरदार चर्चेत आहे. यामध्ये युझर्स इंटरफेसमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स लावूनही इंप्रूव्ह करू शकतात. याशिवाय यात स्टेटस बार आणि नॉचसाठी डिझाईन करण्यात आलंय.
'डिजिटल वेलबिईंग'साठी तुम्हाला कंपनीच्या वेबसाईटवर रजिस्टर करावं लागेल. त्याशिवाय तुमच्याकडे पिक्सल फोन असणं गरजेचं आहे. 'अॅन्ड्रॉईड पी'च्या बीटा प्रोग्रामचा भाग असलेल्या शाओमी, सोनी, एचएमडी ग्लोबल म्हणजेच नोकिया, ओप्पो, व्हिवो, वन प्लस, असेन्शिअल स्मार्टफोन्सचाही यात समावेश आहे.
नव्या 'अॅन्ड्रॉईड पी'मध्ये सिस्टम नेव्हिगेशनसोबत व्हॉल्युम कंट्रोल, नोटिफिकेशन मॅनेजमेंट आणि स्क्रीनशॉटमध्ये सुधारणा करण्यात आलीय.