मुंबई: आयफोन घेण्याची क्रेस प्रत्येकाला असते. इतकच नाही तर आयफोन अनेकांच्या हाती दिसतातही. बऱ्याचदा आपण जी गोष्ट वापरतो त्यामधील अनेक ट्रिक्स आपल्याला माहिती नसतात. अनेकदा आयफोन वापरणाऱ्यांनाही त्यांच्या फोनमधील फिचर्स किंवा काही खास ट्रिक्स माहिती नसतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक भन्नाट ट्रिक सांगणार आहोत.
बरेचदा आपण आयफोनच्या मागे अॅपल पाहातो. आपल्याला तो लोगो आहे असं वाटतं. पण तो केवळ एक लोगोच नाही तर जादूचं बटण आहे. आता हे ऐकून तुम्हाला थोड आश्चर्य वाटेल. पण होय, या लोगोमध्ये एक बटण आहे जे आपल्याला दिसत नाही. याचा उपयोग करून अनेक गोष्टी आपण फोनमध्ये अगदी सहजपणे करू शकतो.
आयफोनच्या मागे अॅपलचा लोगो आपण पाहातो. तो लोगो म्हणजे केवळ एक स्टेटस नाही तर जादू आहे. एक अशी ट्रिक जी आयफोन वापरणाऱ्या लोकांनाही माहिती नसेल.
आयफोनच्या मागे असलेल्या लोगोमध्ये एक सिकरेट बटण आहे असं कुणी सांगितलं तर विश्वास बसेल का? नाही ना पण ही गोष्ट खरी आहे. या लोगोचा वापर करून तुम्ही अनेक कामं पटापट करू शकता.
काय आहे या बटणाचा उपयोग
या लोगोचा वापर तुम्ही स्क्रीनशॉट घेण्यासाठी, आवाज कमी किंवा जास्त करण्यासाठी देखील वापरू शकता. इतकच नाही तुम्ही स्क्रीन स्क्रोल करण्यासाठी देखील याचा वापर अगदी सहजपणे करू शकता.
कसं कराल अॅक्टिव्हेट
IOS 14 ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या लोकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन 'Accessibility' पर्याय सिलेक्ट करायचा आहे. तिथे Touch हा पर्याय निवडला की त्यानंतर 'Back Tap'नावाचा पर्याय दिसेल.
या 'Back Tap' नावाच्या फिचरला आपल्याला सुरू करायचं आहे. तुम्हाला हवं तेव्हा हे फिचर तुम्ही वापरू शकता आणि या मॅटिक ट्रिकचा वापर करू शकता.