Affordable Maruti Cars: डोळे बंद करुन खरेदी करा मारुतीच्या या ३ कार, तुमच्या प्रत्येक अपेक्षेवर ठरेल अव्वल, किंमतही कमी

Affordable Maruti Cars: मध्यमवर्गीय असो किंवा मग श्रीमंत असतो...आपली हक्काची कार (Car) असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मध्यमवर्गीयांमध्येही गाडी आता एक गरज बनली आहे. यामुळेच चारचाकी गाड्यांच्या खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. जर तुम्हीही 5 ते 10 लाखांपर्यंत कार घेण्याचा विचार करत असाल तर मारुती सुझुकीचे (Maruti Suzuki) तीन पर्याय उपलब्ध आहेत.   

Updated: Mar 15, 2023, 04:15 PM IST
 Affordable Maruti Cars: डोळे बंद करुन खरेदी करा मारुतीच्या या ३ कार, तुमच्या प्रत्येक अपेक्षेवर ठरेल अव्वल, किंमतही कमी title=

Maruti Suzuki 3 Best Affordable Car: आपलं हक्काचं घर असावं त्याचप्रमाणे एक चारचाकी गाडीदेखील असावी अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. करोना काळामध्ये गाडी नसल्याची उणीव अनेकांना फार प्रकर्षाने जाणवली. त्यामुळेच कदाचित करोना काळानंतर चारचाकी खरेदी करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यातही मध्यमवर्गीय कुटुंब थोडा जास्त पैसा खर्च करत अपडेटेड फिचर्स कार विकत घेताना दिसत आहे. तुम्हीदेखील कार घेण्याचा विचार करत असाल तर मारुती सुझुकीचे (Maruti Suzuki) तीन उत्तम पर्याय आहेत. त्याबद्दल जाणून घ्या.

आपल्याकडे गाड्या खरेदी करताना मारुती सुझुकीलाही चांगली पसंती आहे. याचं कारण म्हणजे या गाड्या खिशाला परवडणाऱ्या तसंच कमी मेंटेनन्स, चांगलं मायलेज देणाऱ्या असतात. यामुळेच मारुती सुझुकीच्या अनेक गाड्या या भारतातील सर्वोत्तम विक्रीच्या यादीत असतात. फेब्रुवारी 2023 मध्येही मारुती सुझुकीन आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. 

जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 5 ते 10 लाखांपर्यंतचं बजेट असेल तर मारुती सुझुकीचे तीन पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. या कारमध्ये तुम्हाला हवे असणारे सर्व फिचर्स उपलब्ध आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या तिन्ही कार सीएनजीमध्येही उपलब्ध आहेत. 

Maruti Suzuki Baleno

मारुतीची बलेनो कार 2023 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या कारपैकी एक आहे. गतवर्षी या कारला अपडेट करत लाँच करण्यात आलं होतं. या कारची किंमत 7.64 लाख ते 11.35 लाखांपर्यंत आहे. ही कार 1.2 लीटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिनमध्ये येते. सीएनजीमध्ये ही कार 30 किमीचा मायलेज देते. कारमध्ये अनेक फिचर्स उपलब्ध आहेत. 

Maruti Suzuki Swift

मारुतीची स्विफ्ट कार ही मारुतीची सर्वाधिक विक्री होणारी दुसरी कार आहे. ही कार ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मारुतीने स्विफ्टला बऱ्याच काळापासून अपडेट केलेलं नाही. गतवर्षी सीएनजीसह ही गाडी बाजारात आणण्यात आली. स्विफ्टच्या K सीरीजमध्ये 1.2 लीटरचं डुअल जेट डुअल पेट्रोल इंजिन मिळतं. हे इंजिन मॅन्यूअल ट्रान्समिशनमद्ये 23.20-kmpl आणि AMT गेअरबॉक्सशी जोडल्यानंतर 23.76-kmpl चा मायलेज देतं. सीएनजीमध्ये ही कार 30 किमीचा मायलेज देते.

Maruti Suzuki Alto

मारुतीची अल्टो कार कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी तिसरी कार आहे. मारुती सुझुकी अल्टो 2 मॉडेलमध्ये अल्टो 800 आणि अल्टो K10 उपलब्ध आहे. दुसरं मॉडेल गतवर्षी लाँच करण्यात आलं. यामध्ये अनेक अपडेट करण्यात आले होते. पहिल्यांदा कार खऱेदी करणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. सीएनजीमध्ये ही कार 33 किमीचा मायलेज देते.