नवी दिल्ली : सुजूकी मोटारसायकल इंडियाने 2021 हायाबुझासाठी बुकिंग पुन्हा सुरू केली आहे. एप्रिल 2021 मध्ये कंपनीने 101 बाईकच्या पहिल्या खेपेची बुकिंग सुरू झाल्या झाल्या दोन दिवसात विकली गेली. पहिल्या खेपेच्या बाईक कंपनीने डिलेव्हरी देण्यास सुरू केले आहे. ऑगस्ट 2021 पर्यंत बाईक्सची दुसरी खेप भारतात येण्याची शक्यता कंपनीने दाखवली आहे.
नव्या हायाबुझाची एक्स शोरुम किंमत 16.40 लाख इतकी आहे. यासोबतच 1340 सीसीचे फोरस्ट्रोक, फ्युअल इजेक्टेड, लिक्विड-कूल्ड, डीओएचसी, इनलाइन फोर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 9700 आरपीएम वर १८७ बीएचपी आणि 7000 आरपीएमवर 150 एनएम पीक टॉर्क तयार करतो. नवी हायाबुझा तीन कलर वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
बाईकमध्ये सुजूकी इंटेलिजेंट राइड सिस्टिम देण्यात आली आहे. जी रायडरला ऍक्टिव, बेसिक आणि कम्फर्ट मोडची सुविधा देते. या मोडमध्ये पावर, टॅक्शन कंन्ट्रोल, एँटी लिफ्ट कंट्रोल. इंजिन ब्रेक कंट्रोल आणि बाय डायरेक्शनल क्विक शाफ्ट सिस्टिमला अडजस्ट करू शकतील.
बाईकची टॉप स्पीड 299 किमी प्रति तास आहे तर, बाईकचे वजन 264 किलो इतके आहे.