फ्रान्सची प्रमुख वाहन निर्माता कंपनी Citroen ने घरगुती बाजारात आपली मध्यम आकाराची एसयुव्ही C3 Aircross लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असणाऱ्या या एसयुव्हीची सुरुवातीची किंमत 9.99 लाख (एक्स शोरुम) रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या कंपनीने फक्त बेस व्हेरियंटला लाँच केलं आहे. या कारच्या अद्याप मिड आणि टॉप व्हेरियंटच्या किंमतीचा खुलासा झालेला नाही. या एसयुव्हीच्या अधिकृत बुकिंगला सुरुवात झाली आहे. फक्त 25 हजारांच्या किमतीत ही कार तुम्ही बूक करु शकता.
कंपनीने एसयुव्हीला एकूण तीन व्हेरियंटमध्ये सादर केलं आहे. यामध्ये यू, प्लस आणि मॅक्स यांचा समावेश आहे. 'You' हा बेस व्हेरियंट असून याच्या किंमतीची घोषणा करण्यात आली आहे. तसंच मिड व्हेरियंट 'Plus' आणि टॉप व्हेरियंट 'MAX' च्या किंमतीची घोषणा लवकरच केली जाणार आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, 15 ऑक्टोबरपासून या कारची डिलिव्हरी सुरु होणार आहे. भारतीय बाजारपेठेत या कारची मुख्य स्पर्धा Kia Seltos आणि Hyundai Creta सारख्या मॉडेल्सशी असणार आहे. यांची किंमत अनुक्रमे 10.90 लाख आणि 10.87 लाख असणार आहे.
या कारमध्ये फ्रंटला टाइम रनिंग लाइट्स आणि मोठं ग्रील देण्यात आलं आहे. स्किड प्लेट्स पूर्ण फ्रंटला कव्हर करत आहेत. 17 इंचाचे अलॉय व्हील असणाऱ्या एसयुव्ही 5 सीटर आणि 7 सीटर दोघांमध्ये कॉन्फिगरेशन उपलब्ध आहे. 7 सीटर व्हेरियंटमध्ये तिसऱ्या रांगेत काढता येईल अशी सीट देण्यात आली आहे. यामुळे कारमध्ये अतिरिक्त बूट स्पेस मिळतो.
बेस-स्पेक यू व्हेरियंट फक्त 5 सीट कॉन्फिगरेशनसह येते. याचा अर्थ यामध्ये 7-सीट व्हेरियंटमध्ये मिळणारे एसी वेंट्स मिळणार नाहीत. Citroen C3 Aircross च्या बेस व्हेरियंटमध्ये एअरबॅग्ज, EBD सह ABS, ESC, हिल-होल्ड असिस्ट, TPMS आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
मिड आणि टॉप व्हेरियंट 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल बाहेरील रिअर व्ह्यू मिरर (ORVM), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, वॉशरसह मागील वायपर, रियर डिफॉगर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि मॅन्युअल इनसाइड रेअर व्हू मिरर (IRVM) देण्यात आला आहे. बेस मॉडेलमध्ये टचस्क्रीन, स्पीकर, रिव्हर्स कॅमेरा, रिअर वायपर, रिअर डिफॉगर आणि यूएसबी चार्जर उपलब्ध होणार नाहीत.
या एसयुव्हीमध्ये 1.2 लीटर क्षमतेचं टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 109Bhp ची पॉवर आणि 190Nm चा टॉर्क जनरेट करतं. या इंजिनला 6-स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन गेअरबॉक्शी जोडण्यात आलं आहे.