Mobile Phone Charging : आजकाल प्रत्येक जण स्मार्टफोनचा (SmartPhone) वापर करतो. स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भागच बनलाय. दिवसभर मोबाईलचा वापर केला जातो. पण यामुळे मोबाईलच्या बॅटरीवर त्याचा परिणाम होतो. मोबाईलच्या सतत वापराने बॅटरी (Mobile Battery) लवकर संपते. त्यामुळे मोबाईल वारंवार चार्ज करावा लागतो. पण काही जण मोबाईल चार्ज करताना अशा काही चुका करतात, त्याचा परिणाम मोबाईल फोनवर होत असतो. चुकीच्या पद्धतीने फोन चार्ज केल्याने फोनची बॅटरीही खराब होण्याची शक्यता असते.
काही जणं मोबाईल वारंवार चार्ज करतात. म्हणजे अगदी 90 टक्के असतानाही मोबाईल फोन चार्जिंगला लावण्याची काहीजणांना सवय असते. मोबाईल फोन वारंवार चार्ज केल्याने त्याचा परिणाम बॅटरीवर होऊ शकतो.
मोबाईल फोन 100 टक्के चार्ज करता येतो. पण तुम्ही फोन 100 टक्के चार्ज करत असाल तर तुम्ही मोठी चूक करताय. मोबाईची बॅटरी लिथियम पासून बनलेली असते. शंभर टक्के चार्जिंगमुळे बॅटरी गरम होण्याची शक्यता असते. बॅटरी जास्त गरम झाल्यास त्याचा स्फोट होण्याचीही भीती असते. अशा अनेक घटना आपण वाचत असतो. यासाठी मोबाईल फोन 60 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करा. त्यामुळे बॅटरी जास्त वेळ टिकेल आणि कोणत नुकसानही होणार नाही.
तसंच मोबाईल फोनची बॅटरी 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर फोनचा वापर करु नका. फोनची बॅटरी खऱाब होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्या स्मार्टफोनला नेहमी ओरिजनल चार्जरने चार्ज करा. जर तुम्ही दुसऱ्या किंवा लोकल चार्जरने फोन चार्ज केल्यास त्याचा परिणाम बॅटरीवर पडू शकतो. वारंवार अन्य चार्जरने फोन चार्ज केल्यास फोनची बॅटरी खराब होऊ शकते.