मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेझॉनच्या 'ग्रेट इंडियन सेल'ला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना त्यांच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात नवीन स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट देण्यात येत आहे. या सेलबरोबरच ग्राहकांकडे एसबीआयचं कार्ड असेल तर आणखी डिस्काऊंट देण्यात येणार आहे.
अमेझॉनच्या वेबसाईटवरून ग्राहकांनी शॉपिंग केलं तर त्यांना १० टक्के कॅशबॅक मिळेल तर अॅपच्या माध्यमातून शॉपिंग केल्यास १५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
अमेझॉनच्या या सेलमध्ये आयफोन-७ च्या ३२ जीबी मॉडेलवर १३,२०१ रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. या डिस्काऊंटमुळे आयफोन-७ आता ४२,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येणार आहे. याचबरोबर १५,६०० रुपयांची एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे.
लेनोव्हो वाईब K5च्या ३ जीबी रॅम असलेल्या फोनवर २,५०० रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन ९,४९९ रुपयांना विकत घेता येणार आहे. या स्मार्टफोनवर ९ हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे.
गुगल पिक्सल XL आणि गुगल पिक्सलवर १८,००१ रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. पिक्सल XL आता ४८,९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे तर गुगल पिक्सल ४३ हजार रुपयांमध्ये मिळत आहे.
लेनोव्हो K6 पॉवर या स्मार्टफोनवर एक हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या मॉडेलची किंमत अमेझॉनवर ९,९९९ रुपये एवढी आहे. या स्मार्टफोनसाठी ९ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे.
आयफोन-६ वप १०,९०१ रुपयांचा डिस्काऊंट देण्यात आला आहे. 32 जीबीचं हे मॉडेल आता ३५,९९९ रुपयांना विकत घेता येणार आहे. याच्याबरोबर १५,६०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ऑन नेक्स 64GB या स्मार्टफोनवर ३ हजार रुपयांचा डिस्काऊंट देण्यात आला आहे. या फोनची किंमत आता १४,९०० रुपये झाली आहे. सॅमसंग ऑन 7 वर ७०० रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. यामुळे हा स्मार्टफोन ७,७९० रुपयांमध्ये विकत घेता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी ऑन 5 वर २,३०० रुपये डिस्काऊंट मिळत असल्यामुळे हा फोन ६,६९० रुपयांना मिळत आहे.