नवी दिल्ली : अनेकदा आपला फोन अचानक स्लो किंवा हँग होतो. स्मार्टफोन हँग होण्यामागे सर्वात मोठं कारण हे कोणत्याही प्रकारचे ऍप डाऊनलोड करणं हे असू शकतं. नुकतंच संशोधकांना 'गुगल प्ले स्टोर'वर (google play store) अशा प्रकारचे १७ ऍप सापडले आहेत, ज्याद्वारे युजरच्या स्मार्टफोनमध्ये धोकादायक जाहिराती पाठवल्या जातात. यामुळे स्मार्टफोनचं सिस्टम क्रॅश होण्याचा धोका निर्माण होतो.
सिक्योरिटी कंपनी Bitdefenderद्वारा शोधण्यात आलेल्या ऍपला ५५०,००० हून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे. या ऍपमध्ये रेसिंग गेम, बारकोड आणि क्यूआर-कोड स्कॅनर, हवामानासंबंधी ऍप आणि वॉलपेपर सामिल आहे.
अशाप्रकारचे ऍप ओपन केल्यानंतर एक पॉप-अप जाहिरात दाखवली जाते. अशी जाहिरात फोनची संपूर्ण बॅटरी लो करते. अशाप्रकारचे ऍप फोनमध्ये असल्यास ते त्वरित डिलीट करण्याची आवश्यकता आहे.
कार रेसिंग २०१९, 4K वॉलपेपर, QR कोड रीडर ऍन्ड बारकोड स्कॅनर प्रो, फाइल मॅनेजर प्रो, फाइल मॅनेजर प्रो-मॅनेजर एसडी कार्ड/ एक्सप्लोरर, बारकोड स्कॅनर, स्क्रीन स्ट्रीम मिररिंग, क्यूआर कोड - स्कॅन ऍन्ड रीड बारकोड, क्यूआर ऍन्ड बारकोड स्कॅन रीडर, क्लॉक एलईडी अशाप्रकारचे ऍप डाऊनलोड करण्याआधी विचार करुनच निर्णय घ्या. असे सर्व ऍप फोनला मोठ्या प्रमाणात हानी पोहचवू शकतात.
या धोकादायक ऍपमध्ये अधिकतर ऍप हे QR कोड स्कॅनरशी संबंधीत आहेत.
दरम्यान, यापूर्वीही Google Play Store वरून जवळपास २९ हून अधिक लोकप्रिय ऍप काढून टाकण्यात आले होते. सायबर सिक्युरिटी आणि एँटी वायरस फर्म Quick Heal Security Labs यांनी सांगितलं होतं की, गुगलने जे २९ ऍप काढून टाकले आहेत. यातील २४ ऍप असे आहेत जे मॅलिसियस ऍप आहेत. म्हणजे युजर्सला नुकसान देणारे ऍप आहेत.