मुंबई : आजकाल तरूण मंडळी केवळ सोशल मीडियाला आणि मोबाईलला चिकटून बसलेत असा सर्रास आरोप केला जातो.
अनेकजण सोशल मीडियावर टीका करतात. पण सोशल मीडियाचा स्मार्टली वापर केल्यास अनेक गोष्टींची उत्तरं आणि महत्त्वाची कामं अगदी चुटकीसरशी पूर्ण होऊ शकतात.
गॅस सिलेंडर तुम्ही सोशल मीडियाच्या म्हणजेच फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून बुक करू शकणार आहात. इंडियन ऑयल कार्पोरेशन (IOCL) च्या ऑफिशिएअल पेजवर गॅस सिलेंडरची बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. फेसबुकवर सिलेंडर बुकिंगसोबतच तीन हिस्ट्रीदेखील पाहू शकणार आहात.
गॅस सिलेंडर बुकिंग आणि डिलेव्हरी या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ही सोय सुरू करण्यात आली आहे. देशभरातील ११.५० करोड लोकं या सुविधेचा उपभोग घेऊ शकणार आहेत.
फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून गॅस सिलेंडर बुक करायचा असेल तर तुम्हांला तुमच्या फेसबुक अकाऊंटवर लॉगिंग करावे लागणार आहे.
त्यानंतर इंडियन ऑयल कार्पोरेशन लिमिटेड चे ऑफिशियल पेज (@indianoilcorplimited)ओपन करा.
या पेजवर उजव्या कोपर्यात BOOK NOW चं बटण देण्यात आले आहे. त्यावर क्लिक करा. त्यानंतर नवं पेज ओपन होईल.
नव्या पेजवर कन्टिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर एलपीजी आय डी क्रमांक मागितला जाईल.
एलपीजी आय डी क्रमांक दिल्यानंतर बुक नाऊचा ऑप्शन दिला जाईल.
बुकिंग झाल्यानंतर त्याचं कन्फरमेशन मोबाईलवर दिलं जाईल.