FB चे व्यसन, चक्क कानाखाली मारण्यासाठी ठेवली महिला! एलन मस्क झाले प्रभावित

 Facebook : टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांनी बुधवारी (10 नोव्हेंबर) व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. 

Updated: Nov 13, 2021, 06:42 AM IST
FB चे व्यसन, चक्क कानाखाली मारण्यासाठी ठेवली महिला! एलन मस्क झाले प्रभावित  title=

सॅक्रामेंटो : woman to slap him every time he used Facebook : सध्या स्पर्धेच्या जगात कोण काय करेल, याचा भरवसा नाही. अशीच एक अनोखी शक्कल चर्चेचा विषय ठरली आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांनी बुधवारी (10 नोव्हेंबर) व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. या व्हिडिओमध्ये एक महिला एका पुरुषाला फेसबुकपासून लांब राहण्यासाठी चक्क कानाखाली मारते. मात्र, तुम्हाला वाटेल ही व्यक्ती काम करत नाही. परंतु तसे काहीही नाही. फेसबुकच्या नादात काम करण्यासाठी आणि याची आठवण होण्यासाठी त्या व्यक्तीने कानाखाली थप्पड मारण्यासाठी कामावर महिला ठेवली. 

 थप्पड मारण्यासाठी ठेवली महिला

थप्पड मारण्यासाठी महिला कर्मचाऱ्याला ठेवले आहे, असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा माणूस मनीष सेठी आहे, सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) मध्ये राहतो. तो ब्लॉगर असून वेअरेबल टेक स्टार्टअप (Wearable Tech Startup) माध्यमातून तो लोकांच्या भेटीला येतो. तो पावलोकचा (Pavlok) संस्थापक देखील आहे. फेसबुकवर सातत्याने डोकावत असल्याने काम करण्याचा सेठीला विसर पडतो. त्यामुळे फेसबुकपासून चार हात लांब राहण्यासाठी त्यांने कामावर महिला ठेवली. मात्र, ही महिला त्याच्या कानाखाली प्रत्येकवेळी थप्पड मारते. त्यासाठीच या महिलेला नियुक्त केले आहे. कारा नावाच्या महिलेला कथितरित्या कामावर ठेवण्यात आले होते. महिलेला कामासाठी सुमारे 8 डॉलर प्रति तास पगार दिला जात होता. ज्यामध्ये तिचे एकमेव काम सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्याबद्दल तिच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला थप्पड मारणे आहे.

त्यामुळे ती थप्पड मारायची

एका ब्लॉग पोस्टमध्ये, सेठी म्हणाले की, त्याला थप्पड मारण्यासाठी एका महिलेला नियुक्त करून तो त्याची उत्पादकता  (Productivity) 35-40 टक्क्यांवरून 98 टक्क्यांपर्यंत वाढवू शकला. हा प्रयोग सेठी यांनी 9 वर्षांपूर्वी केला होता. मात्र, उत्पादकता वाढवण्याच्या या अनोख्या पावलाकडे आता एलन मस्क मस्क यांचे लक्ष गेले आणि ते प्रभावित झालेत. 

एलन मस्क यांनी दिली प्रतिक्रिया 

सेठीच्या ट्विटला उत्तर देताना, एलन मस्क यांनी 2 फायर इमोजी पाठवले, ज्यामुळे ब्लॉगर प्रभावित झाला. थोड्याच वेळात, सेठीने मस्क यांना उत्तर दिले आणि त्याच्या स्टार्टअपबद्दल बोलला, 'मी या चित्रातील माणूस आहे. @elonmusk मला दोन इमोजी देत ​​आहे हे माझे सर्वात मोठे यश आहे?' याशिवाय, इतर लोकांच्या ट्विटला उत्तर देताना सेठी म्हणाले की, 'अशाच प्रकारचा पावलोक (Pavlok) सुरू करण्यात आला होता. जो सोशल मीडियावर (Facebook)  अधिक वेळ घालवण्यासाठी यूजरला विजेचा लहानसा झटका देत होती'