iQOO Neo 7: भारतीय तरुणांमध्ये मोबाईल फोनची मोठी क्रेझ असते. कोणताही नवा फोन आला तर अनेकांना त्याचे फिचर्स जाणून घेण्याची इच्छा असते. अशातच iQoo इंडियाने आपला नवीन फोन iQoo Neo 7 5G भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन एका ऑनलाइन कार्यक्रमात लॉन्च करण्यात आलाय. नवीन फोन हा गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या iQoo Neo 6 ची अपग्रेडेड मॉडेल असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे तुम्हीही मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी खुल्ला असणार आहे. (iqoo neo 7 launched in india with dimensity 8200 soc price features and specifications know details)
नव्या iQoo Neo 7 5G मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर आहे, त्याचबरोबर हा प्रोसेसर असलेला भारतात येणारा हा पहिला फोन आहे, त्यामुळे याच्या मागणीत चांगलीच वाढ होताना दिसतेय. त्याचबरोबर iQoo Neo 7 5G मध्ये 120W फास्ट चार्जिंग देखील आहे, ज्यासह 10 मिनिटांमध्ये 50 टक्के चार्जिंगचा दावा केला गेला आहे.
कंपनी iQOO Neo 7 ने 2 स्टोरेज पर्याय म्हणजेच 8/128GB आणि 12/256GB व्हेरियंटमध्ये लॉन्च केला आहे. iQOO Neo 7 च्या 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे तर 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये असणार आहे.
फोन घेताय म्हटल्यावर कॅमेरा चेक करणं गरजेचं असतंय. iQoo Neo 7 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप करण्यात आलाय. त्यातील मेन कॅमेरा 64 मेगापिक्सल्सचा देण्यात आलाय, जो OIS (Optical Image Stabilization) सपोर्टसह येतो. याशिवाय फोनमध्ये 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. त्यामुळे चांगले फोटो देखील दिसतात.
खरेदी करताय म्हटल्यावर डिसकाऊंट तर मिळायलाच पाहिजे. तुम्ही हा स्मार्टफोन ICICI, HDFC किंवा SBI क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 1500 रुपयांची सूट मिळेल. कंपनी 2,000 रुपयांची एक्स्ट्रा एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. 9 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. त्यामुळे तुम्हालाही फोन घेयचा असेल तर लगेच घाई करा.