मुंबई : जिओमुळे हवेत असलेल्या मोबाईल कंपन्या जमिनीवर आल्या. मात्र आता जमिनीवरच्या युद्धाही जिओ आणि इतर कंपन्यात चांगलीच टक्कर सुरू आहे. यात मोबाईल कंपन्यांची एकमेकांशी स्पर्धा करत असताना डोकी फुटत असली, तरी ग्राहकांमध्ये आनंदाचं उधाण आलं आहे.
मात्र यापूर्वी बिल भरताना, ग्राहकांच्या नाकी नऊ आले होते. आता कुठे ग्राहकांना जरा हायसं वाटतंय. आता पुन्हा एकदा जिओनं हाय स्पीड इंटरनेटचे नवे प्लॅन लाँच केल्या आहेत. जिओच्या डेटा क्रांतीनंतर टेलिकॉम सेक्टरमधील इतर कंपन्यांनी, देखील आता नवीन ऑफर देण्यास सुरूवात केली आहे.
जिओने ग्राहकांना नवनवीन प्लान देण्याचा धमाका सुरूच ठेवला आहे. ग्राहकांना दररोज २ जीबी हायस्पीड डेटा, ५०९ रूपयांना दिला जाणार आहे. यात लोकल, एसटीडी, मेसेज आणि रोमिंग फ्री कॉल असणार आहेत. या प्लानमध्ये एकूण ९८ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 49 दिवसांसाठी असणार आहे. २ जीबीपर्यंत हाय-स्पीड डेटा वापरल्यानंतर स्पीड कमी होऊन ६४ केबीपीएस होईल.
या प्लॅनमध्ये ८४ जीबीपर्यंत डेटा मिळणार, मात्र याची व्हॅलिडिटी २८ दिवसांसाठी असणार आहे. जिओच्या ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३ जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग देण्यात आलं आहे. सूचना- कोणताही प्लान घेण्यापूर्वी, संपूर्ण चौकशी केल्यानंतरच रिचार्ज करा.