जिओ बाजारात ! अवघ्या १५ दिवसात होणार एवढ्या फोनची विक्री

 जिओ कंपनीने १५ दिवसांत ६० लाख फोन विकण्याचे टार्गेट ठेवले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 25, 2017, 04:54 PM IST
जिओ बाजारात ! अवघ्या १५ दिवसात होणार एवढ्या फोनची विक्री title=

मुंबई : अनेक दिवस उत्सुकता लागून राहिलेला रिलायन्स जिओचा फोन अखेर बाजारात आला आहे. ज्यांनी फोनची बुकिंग केली होती त्यांना डिलीव्हरी मिळण्यासही सुरूवात झाली आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या मते चॅनल पार्टनरने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीने १५ दिवसांत ६० लाख फोन विकण्याचे टार्गेट ठेवले आहे.

प्रथम ग्रामीण भागात हा फोन वितरीत झाल्यानंतर शहरांमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागादरम्यान एक पूल म्हणून जिओ फोन काम करेल असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी याआधीही स्पष्ट केले होते. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, २०१७ च्या दुसऱ्या तिमाहीत ६१  लाखांपेक्षा जास्त मोबाइल फोन विकले गेले आहेत. आता भारतातील एकूण मोबाइल फोन बाजारपेठेमध्ये जीओच्या विक्रीचा भाग हा १० टक्के  एवढा असणार असल्याचे बोलले जात आहे. कारण कंपनीने६० लाख फोन विकण्याचा टार्गेट ठेवले आहे.