मुंबई : कोरोना महामारीमुळे राज्यात लागू झालेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविली जात असून ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक सवलती देण्यात येत आहेत. तसाच नवा प्रयोग करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी लोकार्पण केलेल्या "महाजॉब्स" या संकेतस्थळावर अवघ्या चार तासातच सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी केली आहे. आता या ठिकाणी नोंदणी करणाऱ्या किती उमेदवारांंना नोकरीची संधी मिळार याची उत्सुकता आहे.
नवीन उद्योगांत सुसूत्रता येण्यासाठी #MahaJobsPortal उपयुक्त ठरेल. महास्वयं व महाजॉब्ज पोर्टलमध्ये होणाऱ्या नोंदणीचे समन्वयन होणार. या माध्यमातून मिळणारी माहिती ऑनलाइन रोजगार मेळाव्यासाठी फायद्याची ठरेल- कौशल्य विकास मंत्री @nawabmalikncp pic.twitter.com/GGRPdQJRJ7
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 6, 2020
राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि त्याचबरोबर उद्योजकांनाही कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. याला लोकार्पणाच्या पहिल्याच चार तासात चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.
राज्यातील उद्योगांत ५० हजार रोजगार उपलब्ध. त्यामुळे #MahaJobsPortal द्वारे नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात शासनाकडून समन्वय. भूमिपुत्रांनाच नोकरीची संधी मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट. याद्वारे राज्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी मदत होणार- उद्योग मंत्री @Subhash_Desai pic.twitter.com/YEK4mEVdnf
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 6, 2020
संकेतस्थळाचा रोजगार उपलब्ध करुन देण्याचा मुख्य उद्देश पूर्ण करण्याबरोबच राज्यातील उद्योगांची चाके पुन्हा त्याच गतीने धावण्यास मदत होणार आहे. http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तरुणांना आणि उद्योजकांना नोंदणी करता येणार आहे, राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.
#MahaJobsPortal बेरोजगारांची नोंदणी करणारे नाही, तर बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे. हे पोर्टल अधिक सोपे आणि सुटसुटीत असावे. या पोर्टलच्या माध्यमातून नोकरी-रोजगार देण्यासाठी किती उपयोग झाला, याचा नियमित आढावा घेतला जावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना pic.twitter.com/9ruRwscvXb
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 6, 2020
राज्यातील उद्योग सुरू व्हावेत यासाठी परवानग्या देण्यात आल्या असून हजारो उद्योग सुरु झाले आहे. एका बाजूला तरूणांना काम नाही आणि दुसऱ्या बाजूला उद्योजकांना मनुष्यबळ नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून त्याचा फायदा हजारो तरुणांना आणि उद्योजकांना होणार आहे. ही संधी तरुणांनी हातची घालवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.