नवी दिल्ली : देशातली सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनं (Maruti Suzuki) आपल्या नव्या एमपीव्ही कार एक्सएल ६ (XL6) ही कार भारतीय बाजारात लॉन्च केलीय. कार शौकीन या गाडीची आतुरतेनं वाट पाहात होते. सहा आसनं असलेली ही गाडी मारुतीच्या सद्य अर्टिगावर आधारीत आहे. परंतु, कंपनीनं कारची स्टायलिंग अर्टिगाहून वेगळी ठेवलीय. याची विक्री मारुतीच्या प्रीमियम डीलरशिप नेक्साद्वारे केली जार्ईल.
XL6 मध्ये अर्टिगाच्या तुलनेत काही बदल करण्यात आलेत. यामध्ये नव्या एलईडी हेडलाईटस, नव्या आकाराचा बोनट आणि नवी डिझाईन देण्यात आलीयच. समोर मोठी ग्रिल देण्यात आलीय. मोठी ग्रिल आणि प्लास्टिक क्लॅडिंगसोबत नवा बंपर फ्रंट लूक आणखीनच आकर्षक दिसतोय. XL6 मध्ये रुफ रेल्सही देण्यात आलंय.
मारुती XL6 चं कॅबिन काळ्या रंगात आहे. यामध्ये ३ रांगेत ६ जागा आहेत. सहा आसनी या गाडीत दोन कॅप्टन सीट आहेत. दुसऱ्या रांगेत आर्मरेस्टसोबत दोन कॅप्टन सीट देण्यात आल्यात.
कारमध्ये नवा स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटन्मेंट सिस्टम, हाइट एडजेस्टेबल चालक सीट आणि रिअर वॉशर / वायपरसारखे फिचर्स आहे. टॉप वेरिएन्टमध्ये रिवर्स कॅमेरा, लेदर सीटस् आणि क्रूज कंट्रोलचीही सुविधा मिळेल.
उल्लेखनीय म्हणजे, मारुतीची ही पहिली वहिली सहा आसनी गाडी आहे. कारच्या बेस मॉडलची किंमत ९.७९ लाख रुपये आहे. पेट्रोल इंजिनच्या या गाडीला कंपनीनं मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन दोन्हीमध्येही लॉन्च केलंय.
XL6 हे Zeta MT बेस वेरिएन्ट आहे. याची एक्स शोरुम किंमत ९.७० लाख रुपये आहे. तर याचं एटी व्हर्जन १०,८०,६८९ रुपये आहे. कारचं सर्वात उच्च वेरिएन्ट अल्पा एमटी आहे. याची किंमत १०,३६,१८९ रुपये आहे. अल्फा एटी ११,४६,१८९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.