मुंबई : व्हॉटसअॅपचा वापर आता फक्त मेसेजिंगसाठीच नाही तर वेगवेगळ्या कारणांसाठीही होतो आहे. गेल्या २ वर्षात व्हॉटसअॅपमध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. मेसेज पाठवण्यावर बंधन, एकाच वेळी ४ जणांना व्हिडीओ कॉल करण्याची सोय, लाईव्ह लोकेशन पाठवण्याची सुविधा, यासारखे अनेक बदल व्हॉटस्अॅपने केले. आता व्हॉटसअॅपला अजून काही बदल करायचे आहेत. आपण पेमेंट करण्यासाठी गुगल पे, भीम अॅपचा वापर करतो. अशीच सेवा व्हॉटअॅप युझर्सना देणार आहे. त्यासाठी व्हॉटसअॅपने रिझर्व्ह बँकेकडे परवानगी मागितली आहे.
व्हॉसअॅपकडून १० लाख युझर्ससोबत, काही दिवसांपासून या प्रयोगाची चाचणी घेतली जातेय. तरी देखील सेवा सुरु करण्यासाठी नियामक मंडळाकडून परवानगी मिळाली नाही. प्रत्येक व्यवहारावर कॅशबॅक आणि चांगल्या ऑफरमुळे, गुगल पे लोकप्रिय ठरतंय. त्यामुळे 'गुगल-पे' ला कोणताही तगडा प्रतिस्पर्धी सध्या तरी नाही. व्हॉटसअॅपकडून पेमेंट सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरु आहे. व्हॉट्सअॅप पेमेंटच्या प्रस्तावाला परवानगी द्यावी, यामुळे युझर्सना फायदा होईल, असं पत्र व्हॉट्सअॅपनं आरबीआयला लिहिलं आहे.
व्हॉटसअॅपने पत्रात म्हटलंय की, व्हॉटसअॅपच्या भीम यूपीआय (यूनिफायड पेमेंट इंटरफेस) या पेमेंट प्रणालीला परवानगी देऊन भारतीयांच्या सुविधेसाठी तात्काळ उपल्बध करुन द्यावं. डीजिटल पद्धतीने पैसे पाठवण्याची सोय, तसेच सुरक्षित सेवा देण्याची संधी आम्हाला द्यावी.
५ नोव्हेंबरला लिहिलेल्या पत्रात व्हॉटसअॅपच्या सहकारी बँकांनी परवानगी मिळावी, यासाठी पत्र लिहिलंय. आजघडीला भारतातील १० लाख युझर्सच्या व्हॉटसअॅपवरुन पैसे पाठवण्याच्या सेवेची चाचणी केली जातेय.