नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्री कंपनीच्या जियोने शुक्रवारी मान्सून हंगामा ऑफर सुरू केलीयं. यानुसार जियोचे ग्राहक आपल्या जुन्या मोबाईलच्या बदल्यात ५०१ रुपये देऊन नवा हॅंडसेट घेऊ शकतात. जुना हॅंडसेट कोणत्याही कंपनीच असलेला चालणार आहे.. २१ जुलैपासून ही ऑफर सुरू होणार असल्याचे RILL च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले होते. पण एक दिवस आधीच ही ऑफर सुरू झाली आहे.
रिलायन्सने पहिल्यांदाच मोबाईल सेवा सुरू केली तेव्हा ५०१ रुपयांत हॅंडसेट देण्यास सुरूवात केली होती. २००३ मध्ये कंपनीने ही ऑफर आणली होती. त्या कंपनीचे नाव रिलायंस इन्फोकॉम असे होते. ते नंतर रिलायंस कम्युनिकेशन झाले. त्यानंतर ग्राहकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. २००५ मध्ये ही कंपनी अनिल अंबानी यांच्याकडे आली होती.
ड्युअल सिम
२.४ इंच QVGA डिस्प्ले
Kai ऑपरेटिंग सिस्टिम
५१२ MB रॅम
४GB इंटरनल स्टोरेज, 128GB पर्यंत वाढणार
२००० mAHबॅटरी
२ मेगापिक्सल रेयर कॅमरा आणि VGA फ्रंट फेसिंग कॅमरा
FM, ब्लूटूथ, GPS, Wi-Fi, NFC सपोर्ट
फेसबुक, यूट्यूब, व्हाट्सअॅप
सध्याच्या जिओ फोनमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप वापरता येत नाही. पण नव्या फोनमध्ये ही सुविधा असेल. जुना फोन अपग्रेड होणार असल्याचे डायरेक्टर ईशा अंबानीने घोषणा केली. वॉईस कमांड देऊन व्हिडिओ प्ले करता येणार आहे. १५ ऑगस्टपासून हे सारे फिचर्स उपलब्ध होतील.
जर तुम्हाला हा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर वेबसाइटवर जाऊन स्वत:ची नोंदणी करावी लागेल. आपला फोन नंबर, पत्ता अशी माहिती तुम्हाला द्यावी लागेल. कंपनीतर्फे ईमेल किंवा मेसेज करून तुम्हाला कन्फर्मेशन दिले जाणार आहे. बुकिंग संदर्भातील महत्त्वाची माहितीदेखील मेल किंवा मेसेजद्वारे मिळणार आहे.