मुंबई : New mobile banking 'Trojan' virus prowling in Indian cyberspace : मोबाईल बँकिंग सिस्टीमला व्हायरसचा मोठा धोका निर्माण झालाय. तुमचे खाते क्षणात रिकामे होऊ शकतं. हॅकिंग व्हायरसचा नवे व्हर्जन भारताच्या ब्लॅक मार्केटमध्ये पोहोचले आहे. त्यामुळे आताच सावध व्हा. व्यवहार करताना काळजी घ्या.
मोबाईल बँकिंग सिस्टीमला सोव्हा अँड्रॉईट ट्रोजन व्हायरसचा धोका आहे. हा व्हायरस ब्लॅक मार्केट आणि डार्क वर्ल्डवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या नव्या व्हायरसमुळे कोणत्याही मोबाईल बँकिंग सिस्टीमचा युझरनेम आणि पासवर्ड ह्रक करता येऊ शकतो. तो एकदा मोबाईलवर इन्स्टॉल झाला की तो डिलीटही करता येत नाही.
एक नवीन मोबाइल बँकिंग 'ट्रोजन' व्हायरस आहे, तो Android फोनला अधिक धोकादायक आहे. (A new mobile banking 'Trojan' virus - SOVA ) तो फोनमधून पैशाची चोरी करु शकतो. तसेच तो एकदा का इंस्टॉल झाला तर तो अनइंस्टॉल करणे कठीण आहे. हा व्हायरस भारतीय ग्राहकांना लक्ष्य करत आहे, असे देशाच्या फेडरल सायबर सुरक्षा एजन्सीने आपल्या नवीन अहवालात म्हटले आहे.
जुलैमध्ये भारतीय सायबर स्पेसमध्ये पहिल्यांदा आढळल्यानंतर हा 'Trojan' virus त्याच्या पाचव्या आवृत्तीत अपग्रेड झाला आहे, असे त्यात म्हटले आहे. भारतीय बँकिंग ग्राहकांना एका नवीन प्रकारच्या मोबाइल बँकिंग मालवेअर मोहिमेद्वारे (mobile banking malware campaign) लक्ष्य केले जात आहे. या मालवेअरची पहिली आवृत्ती सप्टेंबर 2021 मध्ये ब्लॅक मार्केटमध्ये विक्रीसाठी दिसला. की लॉगिंगद्वारे यूजर्सच्या नावे आणि संकेतशब्द, कुकीज चोरणे आणि अॅप्समध्ये घुसखोरी करतो.
SOVA पूर्वी अमेरिका, रशिया आणि स्पेन सारख्या देशांवर टार्गेट केले होते. परंतु जुलै 2022 मध्ये त्याने भारतासह इतर अनेक देशांना आपल्या लक्ष्यांच्या यादीत समाविष्ट केले. या मालवेअरची नवीन आवृत्ती यूजर्सला फसविण्यासाठी Chrome, Amazon, NFT (non-fungible token linked to crypto currency) आदी प्लॅटफॉर्म सारख्या काही प्रसिद्ध अॅप्सच्या लोगोसह दिसणारे बनावट Android अॅप्लिकेशन्समध्ये स्वतःला लपवतो. त्यामुळे तो लगेच समजत नाही. "हे मालवेअर क्रेडेन्शियल कॅप्चर करते जेव्हा यूजर्सना त्यांच्या नेट बँकिंग अॅप्समध्ये लॉग इन करतात आणि बँक खात्यांमध्ये प्रवेश करतात. SOVA ची नवीन आवृत्ती बँकिंग अॅप्स आणि क्रिप्टो एक्सचेंज/वॉलेटसह 200 हून अधिक मोबाइल अनुप्रयोगांना टार्गेट करत असल्याचे दिसते. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.