Realme Pad X India Launch Date, Specifications Price: आपण मोबाईल वापरताना बऱ्याचदा आपल्या हातात मोठी स्क्रीन असायला हवी होती असं वाटतं तर कधी लॅपटॉप वापरताना आपल्या स्क्रीनची साईज थोडी कमी हवी होती असं देखील वाटतं. या समस्येवर मध्यवर्ती उपाय म्हणजे टॅब्लेट वापरणं हा आहे. जर तुम्ही कमी किंमतीत नवीन टॅबलेट विकत घेण्याचा विचार करत असाल, आज म्हणजेच 26 जुलै 2022 ला Realme ने आपला नवीन टॅबलेट Realme Pad X भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा कमी किंमतीचा 5G टॅबलेट अनेक फीचर्सने सुसज्ज आहे. या टॅब्लेटमध्ये तुम्हाला कोणते फीचर्स मिळतील, त्याची किंमत किती आहे आणि तुम्ही तो कसा खरेदी करू शकता याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Realme ने आज (26 जुलै 2022) एक नवीन 5G टॅबलेट Realme Pad X लॉन्च केला आहे. या टॅबलेटसोबतच, कंपनीने एक स्मार्टवॉच, Realme Watch 3, neckband earphones, Realme Buds Wireless 2S आणि earbuds, Realme Buds Air 3 TWS लॉन्च केले आहेत.
वेगवेगळ्या फीचर्स असलेल्या या टॅब्लेटची खास गोष्ट म्हणजे याची किंमत खूपच कमी आहे. Realme Pad X तीन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च केलं आहे आणि त्यांचे WiFi सपोर्ट असलेले बेस व्हेरिएंट Rs 17,999 च्या किंमतीत लॉन्च केले गेले आहेत; यामध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिले जाणार आहेत. 5G सपोर्ट असलेल्या वेरिएंटची किंमत 23,999 रुपये इतकी आहे आणि यामध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळेल. Realme Pad X च्या टॉप मॉडेलमध्ये 5G सपोर्ट, 6GB RAM आणि 128GB स्टोरेज दिली जात आहे, ज्याची किंमत 25,999 रुपयांना खरेदी करता येईल.
हा टॅब्लेट विक्रीसाठी 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार आहे आणि या टॅबची खरेदी करताना तुम्हाला अनेक आकर्षक ऑफर्स देखील मिळतील.
तीन स्टोरेज प्रकारांसोबत Realme Pad X मध्ये 10.95-इंचाचा WUXGA + डिस्प्ले आणि 60Hz चा रिफ्रेश दर मिळेल. हा टॅबलेट 84.6 इंच स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि डीसी डिमिंग फीचरसह लॉन्च करण्यात आला आहे. Qualcomm Snapdragon 695 SoC प्रोसेसरवर चालणारा, हा टॅबलेट निळा आणि काळा या दोन रंगांमध्ये उपलब्ध आणि त्यासोबत तुम्हाला चार स्पीकर ग्रिल आणि Android 12-आधारित Realme UI 3 OS मिळतील. यामध्ये तुम्हाला 8,340mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील दिला जात आहे.