2999 रुपयांत मिळेल जिओचा नवा फोन 'जियो -2'

रिलायन्स इंडस्ट्रीजची ४१ वी अॅन्युअल मिटींगमध्ये कंपनीने नवनव्या घोषणा केल्या आहेत.

Updated: Jul 5, 2018, 12:39 PM IST
2999 रुपयांत मिळेल जिओचा नवा फोन 'जियो -2' title=

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजची ४१ वी अॅन्युअल मिटींगमध्ये कंपनीने नवनव्या घोषणा केल्या आहेत. यात खास म्हणजे जिओचे २ नवे फोन्स. मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी आणि मुलगा आकाश अंबानी यांनी ही घोषणा केली. मिटींगमध्ये मुकेश अंबानींनी सांगितले की, येणाऱ्या वर्षात कंपनीत अनेक ट्रांसफॉर्मेशन होतील. जिओ फोनमध्ये दोन नवे फिचर्स अॅड करण्यात आले आहेत. ते ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस पडतील.

भारतीय बाजारात बोलबाल असलेल्या जिओचे दोन नवे फोन लॉन्च होणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात मार्केटमधील वातावरणचं बदलेल. पाहुया काय असेल या फोन्सची खासियत....

जिओचे हे दोन फोन्स १५ ऑगस्टपासून विक्री सुरु होईल. जुना फोन देवून नवा फोन २१ जुलैपासून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 501 रुपये अधिक मोजावे लागतील.

हे आहेत फिचर्स

  • १५ ऑगस्टपासून जिओफोन-2 मिळेल. 
  • किंमत 2,999 रुपये असेल.
  • घरातील कॅमेरे देखील जिओ फोन 2 ने चालू शकतील.
  • याचे अॅप व्हाईस कमांडने ओपन होतील.
  • यात जिओ फोनवर फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि युट्युब देखील चालेल.