मुंबई : रिलायनस जिओने आपली होम ब्रॉडबँड सर्व्हिस लवकर सुरू करणार असून जिओ फायबरचे कमर्शियल लॉन्चिंग लवकर करणार आहे. या अंतर्गत ५०० रुपयात १०० जीबी डाटा देण्याची योजना आहे.
प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या ऑफरपेक्षा निम्म्या किमतीत आणि दुप्पट डाटा देण्यात येणार आहे. या सर्व्हिसची फ्री ट्रायल काही शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. तसेच जूनपर्यंत या फ्री ट्रायलचा आवाका वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीपासून याचे ऑफिशियल लॉन्चिंग होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार जिओ फायबर नेटवर्क १०० एमबीपीएसचा डाटा स्पीड देण्याची क्षमता आहे. सध्या १० मोठ्या शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रिपोर्टनुसार या वर्षी डिसेंबरपर्यंत १०० लोकेशनला कनेक्ट करण्यात येणार आहे.
सध्या बीएसएसएल १ कोटी सर्वाधिक ग्राहक आहेत, या नव्या ऑफरचे नुकसान बीएसएनएलला होण्याची शक्यता आहे.