मुंबई : रिलायन्स जियोचा स्मार्टफोन बाजारात आला आणि अनेक ग्राहकांनी तासन तास रांगेत उभे राहून त्याची बुकिंग केली. अवघ्या काही तासात हा फोन सोल्ड आऊट झाला होता. पण ज्यांना त्या वेळेस बुकिंग करता आली नाही त्यांच्यासाठी आता लवकरच पुन्हा बुकिंग सुरू होतेय.
जियो बाबत वेबसाईट चौकशी केलेल्या ग्राहकांना 'जियो' स्वतःहून संपर्क करत आहेत. जिओ त्या ग्राहकांना मेसेजच्या अमध्यमातून एक लिंक पाठवत आहेत. ज्यावर क्लिक केल्यानंतर कंपनी फोनबद्दल माहिती देत आहेत.
मेसेजप्रमाणेच जिओने टोल फ्री क्रमांकदेखील सुरू केला आहे. 18008898889 या टोलफ्री क्रमांकावर तुम्ही जिओ फोनची बुकिंग करू शकता.
जिओ फोनची पहिली प्री बुकिंग २४ ऑगस्ट रोजी सुरू झाली होती. दोन दिवसांमध्ये या फोनची बुकिंग सुमारे ६० लाख ग्राहकांनी केली होती.
कंपनीच्या दाव्यानुसार अनेक ग्राहाकांना जिओ फोनची डिलिव्हरीदेखील मिळाली आहे.