रिलायन्स जिओने १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये केला मोठा बदल

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 2, 2017, 05:17 PM IST
रिलायन्स जिओने १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये केला मोठा बदल title=
File Photo

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

जिओने एका वर्षांपर्यंतचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यापासून कंपनीने आपल्या प्लॅन्समध्ये अनेक बदल केले आहेत. सणा-सुदीच्या काळात कंपनीने JioFi डिवाईसवर ऑफर सुरु केली आहे. तसेच आपल्या टेरिफ प्लॅनमध्येही बदल केले आहेत.

रिलायन्स जिओने सर्वात मोठा बदल आपल्या १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये केला आहे. आता युजर्सला या प्लॅनमध्ये २ जीबी ४जी इंटरनेट डेटा, अनलिमिटेड वॉईस कॉलिंग, ३०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन दिलं जाणार आहे. २ जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतरही इंटरनेट सुविधा सुरु राहणार आहे. मात्र, इंटरनेट स्पीड ४जी न मिळता ६४ केबीपीएस होईल.

जुन्या १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना मर्यादा संपल्यानंतर कुठल्याही प्रकारचा इंटरनेट डेटा वापरता येत नव्हता. कंपनीच्या इतर प्लॅन्समध्ये डेटा लिमिट क्रॉस झाल्यानंतरही इंटरनेट वापरता येत होतं. मात्र, १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये त्याचा सहभाग नव्हता.

रिलायन्स जिओ १९ रुपयांपासून १९९९ रुपयांपर्यंत अनेक प्लॅन्सची सुविधा देत आहे. यामध्ये ३९९ रुपयांचं रिचार्ज सर्वाधिक केलं जातं. या रिचार्जमध्ये ८४ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, ८४ जीबी डेटा आणि इतर सुविधा देण्यात येतात.