प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेझॉन, फ्लिपकार्टवर मोठी सूट

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन आघाडीच्या वेबसाईटस यात सहभागी झाल्या आहेत

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 21, 2018, 10:20 PM IST
 प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेझॉन, फ्लिपकार्टवर मोठी सूट
  • मुंबई :  ई-कॉमर्स वेबसाईट्सनी 'द रिपब्लिक सेल' घोषित केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा सेल आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन आघाडीच्या वेबसाईटस यात सहभागी झाल्या आहेत, सेल हा 22 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सुरु होणार आहे, यात हा  सेल फ्लिपकार्टवर 23 जानेवारीपर्यंत, तर अॅमेझॉनवर 24 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

काही क्रेडीट डेबिटना सूट

सिटी क्रेडीट आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तींना 10 टक्के कॅशबॅक मिळेल, तर फोनपे यूझर्सना 15 टक्के कॅशबॅक मिळू शकते. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये लॅपटॉप, कॅमेरासारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवर 80 टक्क्यांपर्यंत, कपडे, अॅक्सेसरिजवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत आणि टीव्हीसारख्या उपकरणांवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. 

 ग्राहकांच्या उड्या पडण्याची शक्यता 

आयफोन 7 हा तुम्हाला 40 हजारांच्या आसपास मिळू शकतो, तर सॅमसंग गॅलक्सी J3 प्रोवर दीड हजारांपर्यंत फ्लॅट ऑफ मिळणार आहे. फ्लिपकार्टवर 19 हजार 990 रुपये किमतीचा ओप्पो F3 स्मार्टफोन अवघ्या 12 हजारात मिळणार आहे. खरेदीसाठी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ग्राहकांच्या उड्या पडण्याची शक्यता आहे.

डिस्काऊंट मोठ्या प्रमाणात

अॅरो, यूसीबीसारख्या ब्रँड्सच्या मेन्सवेअरवर 60 टक्के, तर एथनिक वेअरवर 50 टक्के सूट आहे. फ्लिपकार्टवर महिला फूटवेअर, वेस्टर्न वेअर, सनग्लासेस यांच्यावर 80 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. 

किचन अप्लायन्सेसवर 30 टक्क्यांपर्यंत ऑफ मिळणार आहे. अमेझॉनवर वॉशिंग मशिनवर 35 टक्के, बीपीएलच्या 32 इंच टीव्हीवर 13 हजारांपर्यंत आणि फ्रीजवर 11 हजारांची सूट मिळणार आहे. 

अॅमेझॉनपे यूझर्सना 200 रुपयांपर्यंत 10 टक्के कॅशबॅक मिळेल. अमेझॉनवर एचडीएफसी क्रेडिट कार्डधारकांना 10 टक्क्यापर्यंत अॅडिशनल कॅशबॅक मिळणार आहे.