नवी दिल्ली : कोरियन कंपनी सॅमसंग प्रत्येक महिन्याला एक स्मार्टफोन लाॅंच करते. या महिन्यात देखील कंपनीने मोबाईल लॉंच केलाय. कंपनीने आज Samsung Galaxy F12 आणि Samsung Galaxy F02s स्मार्टफोन लाॅंच केलेयत. हे दोन्ही बजेट स्मार्टफोन आहेत. ई कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर हे फोन उपलब्ध आहेत.
गॅलेक्सी एफ 02 हा लो बजेटचा फोन लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची किंमत 8,999 रुपये पासून सुरू होते. यात 5000mAh बॅटरी, 13 एमपी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर असे फिचर्स आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.
गॅलेक्सी एफ 12 स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे. हा नवा फोन 48 एमपी कॅमेरा आणि 90 एचझेड रिफ्रेश रेटसह डिस्प्लेसह येतोय. या डिव्हाइसमध्ये 6000mAh ची बॅटरी आणि Exynos 850 प्रोसेसर आहे.
Samsung Galaxy F12मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे. यामध्ये Infinity-V नॉच डिझाईन आहे. फोनची स्क्रीन एचडी + रिझोल्यूशन आणि 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. डिव्हाइसचा मागील पॅनेल चौरस आकाराचा कॅमेरा मॉड्यूल आहे. याची मुख्य लेन्स 48 एमपी सॅमसंग जीएम 2 सेन्सर आहे. त्याशिवाय फोनमध्ये आणखी तीन सेन्सरही आहेत.
स्मार्टफोन बाजुला स्मार्टफोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसह येतो. फोनच्या तळाशी स्पीकर ग्रिल, यूएसबी-सी पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक आहे. यात 6000mAh बॅटरी आणि Exynos 850 प्रोसेसर आहे.
गॅलेक्सी एफ 0 2 एस स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी + इन्फिनिटी-व्ही स्टाईल नॉच डिस्प्ले आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. डिव्हाइस 13 एमपी मुख्य लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. डिव्हाइसच्या मागील बाजूस आयताकृती आकाराचे एक कॅमेरा मॉड्यूल आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 450 चिपसेटसह बाजारात आणला जाईल.